रॅप गाण्यावरून वाद; १० जणांच्या मारहाणीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : रॅप गाण्यावरून वाद; १० जणांच्या मारहाणीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

परस्परविरोधी गुन्हे दाखल; सहा तासांत आरोपींना ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Dispute over rap song; 20-year-old youth dies after being beaten by 10 people

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: 'रॅप साँग' कोण चांगले गातो, या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादातून १० जणांच्या गटाने एका २० वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करत आणि विटा-सिमेंटच्या गट्टने ठेचून त्याचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २८ जून रोजी मध्यरात्री पावणेएक वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखाली शेखर लहाने राजीवनगर येथे घडली.

वेदांतनगर पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन राबवून अवघ्या सहा तासांत या हत्याकांडातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. मयत दरम्यान, दोन्ही गटात झालेल्या वादामुळे परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून दुसऱ्या गटातील दोघांनाही अटक करण्यात करण्यात आली.

शेखर ऊर्फ पिया लहाने (२०, रा. ईटखेडा) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मृताचा भाऊ मयूर लहाने याच्या तक्रारीवरून अजय भुतकर, अविनाश बोर्डे, संतोष जाधव, इम्रान पठाण, अनिरुद्ध आराख, रोहित गायकवाड, रितेश देवरे, दीपक हिवाळे, मंगेश उगले, मंगेश गायकवाड या १० जणांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव करत आहेत.

दारूच्या नशेत रॅप साँगवरून वाद

२७ जूनच्या रात्री शेखर त्याचा मामेभाऊ श्रीजत अदमाने आणि मित्र प्रथमेश जंगले यांच्यासोबत राजीवनगर येथे गेला होता. तेथे अनिरुद्ध आराख याच्या रिकाम्या घरी अजय भुतकर, अविनाश बोर्डे, इम्रान पठाण यांच्यासह इतर १० जण दारू पीत बसले होते. दारू पीत असतानाच श्रीजत आणि अनिरुद्ध यांच्यात 'रॅप साँग कोण चांगले गाते?' यावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि सर्वजण घराबाहेर पडून

दोन्ही बाजूंनी क्रॉस कंप्लेंट

या प्रकरणात दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले आहेत. पहिली फिर्याद मृत शेखरच्या भावाच्या तक्रारीवरून मुख्य आरोपींवर खुनाचा गुन्हा म्हणून दाखल आहे. दुसरी फिर्याद किसन रमेश गुप्ते (४५, रा. राजीवनगर) यांच्या तक्रारीवरून मृत शेखर लहाने, श्रीजत आदमाने आणि प्रथमेश जंगले (सर्व रा. इटखेडा) या तिघांविरुद्ध जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी दाखल

चाकू, विटा आणि गट्टने जीवघेणा हल्ला

पुलाखाली आल्यावर इम्रान पठाण याने "तू इधर मस्ती कर रहे क्या, तुमको खल्लास करूंगा", असे म्हणत श्रीजतवर चाकूने वार केला. भावाला वाचवण्यासाठी शेखर धावून गेला असता आरोपी अविनाश बोर्डेने शेखरच्या डोक्यावर चाकूने वार केले. त्यानंतर मंगेश गायकवाड आणि अजय भुतकर यांनी त्याच्या डोक्यात वीट व सिमेंटचे गट्ट घातले. या भयंकर मारहाणीमुळे श्रीजत घाबरून पळून गेला आणि त्याने जीव वाचवण्यासाठी लपून बसणे पसंत केले.

पोलिसांची सहा तासांत धडक कारवाई

उड्डाणपुलाखाली एक युवक गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेखरला उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले; मात्र रात्री ३ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी रात्री १ ते सकाळी ६ वाजेपर्यंत राजीवनगर वस्तीत धडक सर्च ऑपरेशन राबवून अविनाश बोर्डे, संतोष जाधव, इम्रान पठाण, अनिरुद्ध आराख, रोहित गायकवाड, दीपक हिवाळे आणि मंगेश उगले यांना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT