शहरात निर्माण झालेल्या तीव्र डिझोल टंचाईमुळे सिडको एन-५ आणि नक्षत्रवाडी जलकुंभावरून धावणारे ५३ पाण्याचे टैंकर शनिवारी पूर्णपणे बंद राहिले. ईधनाअभावी टँकरच्या फेन्या थांबल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.  (छाया : सचिन लहाने)
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेचे 53 टँकर बंद

६० वसाहतींमध्ये पाणीबाणी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईने आता रौद्ररुप धारण केले असून, त्याचा पहिला मोठा फटका नो नेटवर्क भागातील पाणीपुरवठ्याला बसला आहे. डिझेलअभावी शनिवारी (दि. २३) सिडको एन-५ आणि नक्षत्रवाडी या जलकुंभांवरून ६० वसाहतींना पाणीपुरवठा करणारे तब्बल ५३ टैंकर बंद राहिले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या वसाहतींमध्ये तीव्र पाणीबाणी निर्माण झाली आहे.

महानगरपालिका नळाद्वारे ७० ते ७५ टक्के भागाला पाणी पुरवते, तर गुंठेवारीसह नवीन वसाहतींना गेल्या दोन दशकांपासून टँकरद्वारे पाणी दिले जाते. यासाठी नियुक्त दोन कंत्राटदारांपैकी एकाकडे ५३, तर दुसऱ्याकडे ३९ टँकरचे कंत्राट आहे. उन्हाळ्यामुळे टँकरच्या रोजच्या फेऱ्या २०० वरून ३०० वर पोहोचल्या आहेत. मात्र, आठवड्याभरापासूनच्या इंधन टंचाईमुळे टैंकरला डिझेल मिळेनासे झाले आहे.

यामुळेच शुक्रवारी सातारा देवळाईतील काही टेंकर बंद होते, तर शनिवारी सिडको एन-५ आणि नक्षत्रवाडी येथील सर्व ५३ टेंकर उभे होते. सुदैवाने कोटला कॉलनी आणि सिडको एन-७ जलकुंभावरील ३९ टँकरचा पुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र, डिझेल न मिळाल्याने निम्म्याहून अधिक वसाहतींमध्ये पाण्याचा थेंबही पोहोचू शकला नाही. या समस्येमुळे टैंकरचालकांसह नागरिकही हवालदिल झाले आहेत.

टैंकर सेवेसाठीचे जलकुंभ

जलकुंभ - टैंकर

सिडको एन ५ - ४४

नक्षत्रवाडी - ९

सिडको एन ७ - २०

कोटला कॉलनी- १९

या वसाहतींमध्ये पाणीबाणी

हरी प्रसादनगर, छत्रपती नगर, राजगुरू नगर, संत ज्ञानेश्वर नगर, सातारा गाव, सिल्कमिल कॉलनी, सादात नगर, भगवान बाबा आश्रम, ज्योतीनगर, शहा नगर, अमेर नगर, सुधाकरनगर, इटखेडा, एकतानगर, हमेदीया नगर, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, गोलवाडी, बागला हाऊस, गोल्डन सिटी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT