Dhangar community protest : आरक्षणासाठी धनगर समाजाची निदर्शने file photo
छत्रपती संभाजीनगर

Dhangar community protest : आरक्षणासाठी धनगर समाजाची निदर्शने

विभागीय आयुक्तालयासमोर घोषणाबाजी, प्रवेश नाकारल्याने गेटवरच चिटकवले निवेदन

पुढारी वृत्तसेवा

Dhangar community's protests for reservation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी विभागीय आयुक्तालयासमोर धनगर समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासनाकडून कोणीही न आल्याने व आयुक्तालयात प्रवेश नाकाल्याने संतप्त आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य गेटवरच निवेदन चिकटवून शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत रोष व्यक्त केला.

धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, प्रमुख मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज आंदोलन करीत आहे. शासनाने त्याबाबत अंमलबजावणी सुरू करावी, यासाठी सोमवारी धनगर समाजाचे पदाधिकारी आयुक्तालया परिसरात दाखल झाले. राज्यात समाजाच्या वतीने विविध जिल्ह्यांमध्ये आदोलन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. परंतु, विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे आंदोलक संतापले. दरम्यान, प्रशासनातील एकही अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही. त्यावरुन आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.

शिष्टमंडळाचे प्रमुख अरुण रोडगे यांनी सांगितले की, राज्यभरातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सोमवारी निवेदने देण्यात आली. सर्वांनी निवेदन स्विकारले. केवळ छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडूनच निवेदन स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे आमच्याशी अन्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत आंदोलकांनी प्रवेशद्वाराच्या गेटवरच निवेदन चिटकले.

विभागीय आयुक्तांचा निषेध

एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाने आंदोलन केले. विभागीय आयुक्तांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. पंरतु, आयुक्त बाहेर आलेच नाही. त्यामुळे आंदोलकांनी घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध नोंदवला

प्लॅन बी' तयार ठेवा

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समाजाच्या बाजूने लागेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, निकाल प्रतिकूल लागल्यास धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी पर्यायी मार्गाने कशी करता येईल, यासाठी शासनाने आतापासूनच 'प्लॅन बी' तयार ठेवावा, असे आंदोलकानी निवेदनात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT