Sambhajinagar Bus Stand : लाखो रुपये खर्चुनही मुख्य बसस्थानकांच्या नशिबी खड्डेच file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Bus Stand : लाखो रुपये खर्चुनही मुख्य बसस्थानकांच्या नशिबी खड्डेच

धुळीमुळे प्रवाशांसह कर्मचारीही हैराण

पुढारी वृत्तसेवा

Despite spending lakhs of rupees, there are still potholes at the main bus stands

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्य बसस्थानकांतील खड्डे बुजवण्यासाठी तसेच स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले. एवढा खर्च करून काही दिवस संपत नाहीत तोच स्वच्छतागृहांतील घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर नुकतेच बुजवलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. बसस्थानकातील धुळीमुळे प्रवाशांसह कर्मचारीही हैराण झाले आहेत. याकडे मुख्य कार्यालयात कॅबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लाखो रुपये खर्चुन मुख्य बसस्थानकांवरील खड्डे बुजवण्यात आले. हे काम योग्य पद्धतीने झाले नसल्याने पूर्ण बसस्थानकांत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्याच बरोबर नुकतेच स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम केले आहे. या कामांची पाहणी नुकतीच परिवहन मंत्र्यांनीही केली होती. ते पाहणी करून जाताच स्वच्छतागृहातून पाणी लिकेज होण्यास सुरुवात होत आहे. या पाण्यामुळे स्वच्छतागृहाच्या पाठीमागे खड्डे पडले आहेत. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष करत असल्याने कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी संताप व्यक्त करत आहेत.

हेलकावे खात प्रवास

दरम्यान खड्डे योग्य पद्धतीने बुजवले नसल्याने आजही मुख्य बसस्थानकात येणाऱ्या आणि येथून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये हेलकावे खातच प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रवाशांबरोबर चालक आणि वाहकही हेलकावे खात आपले कर्तव्य बजावत आहेत.

धुळीमुळे प्रवासी हैराण

मुख्य बसस्थानकांतील खड्डे बुजवण्याचे काम झाल्यापासून या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ही बाब स्वतः परिवहन मंत्र्यांनी अनुभवली. मंत्री महोदयांनी चौकशी करणार असल्याचेही सांगितले होते. असे असतानाही वरीष्ठ अधिकारी मात्र याकडे जाणूनबुजून कानाडोळा करत आहे. या धुळीमुळे कर्मचारी आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT