Water supply scheme : पाणी योजनेला विरोध केल्यास हद्दपारीची कारवाई File Photo
छत्रपती संभाजीनगर

Water supply scheme : पाणी योजनेला विरोध केल्यास हद्दपारीची कारवाई

पोलिस आयुक्तांचा इशारा देवळाईत १३०० मिमी व्यासाच्या पाईपलाईनला नकार

पुढारी वृत्तसेवा

Deportation action if opposition to water scheme

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

नक्षत्रवाडीहून शहरात आणण्यात येणाऱ्या १३०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या कामाला महिनाभरापासून दे-वळाईच्या पटेलनगर भागात विरोध सुरू होता. गुरुवारी (दि.१९) हा वाद चिघळल्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विरोध कराल तर हद्दप-ारीची कारवाई होईल, असा इशारा नागरिकांना दिला. त्यानंतर लगेच नागरिकांचा विरोध मावळल्याने कामाला सुरुवात झाली.

शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) नियुक्त केलेल्या जीव्हीपीआर एजन्सीमार्फत सुरू आहे. यातील जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. तर नक्षत्रवाडी येथील डोंगरावर असलेल्या एमबीआरमधून शहरात पाणी आणण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या १३०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम सध्या देवळाईमार्गे सुरू आहे.

या कामादरम्यान पटेलनगर येथील एका गल्लीमध्ये या कामाला विरोध झाला. कंत्राटदार कंपनीचे कर्मचारी याठिकाणी मार्किंग करण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी त्यांना हुसकावून लावले. सतत सुरू असलेल्या या विरोधामुळे अखेर कंत्राटदाराने न्यायालयाच्या आदे शानुसार ही माहिती महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांना दिली. त्यावरून पोलिस आयुक्त प्रवीण पवार स्वतः रस्त्यावर उतरले.

पोलिस आयुक्तांसोबत मोठा फौजफाटा दाखल झाल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांना पाहून विरोध करणारे भयभीत झाले. पोलिस आयुक्त पवार यांनी नागरिकांशी संवाद साधत न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. तसेच आतापर्यंत एका जणावर हद्दपारीची कारवाई झाली असून, त्या यादीत तुमचाही नंबर लावायचा नसेल तर जलवाहिनीच्या कामाला विरोध करू नका, असा निर्वाणीचा इशाराही दिला.

जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता ए. बी. देशमुख, के. एम. फालक, जीव्हीपीआर कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गुगुलोथू, अभियंता खलील अहेमद, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहय्यक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक अविनाश अघाव, प्रविणा यादव, अशोक शेरमाळे, संग्राम ताठे, रविकिरण दरडो यांच्यासह फौजफाटा तैनात होता.

दीड महिन्यानंतर निघाला मार्ग

पटेलनगरमध्ये मागील दीड महिन्यापासून मार्किंग करण्यास विरोध सुरू होता. मोठ्या आकाराच्या पाईपमुळे घरांना तडे जातील म्हणून विरोध सुरू होता. मात्र गुरुवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी समजूत काढल्यानंतर मार्किंगला सुरुवात झाली व विरोध मावळला.

२० फुटांच्या गल्लीमुळे नागरिकांचा विरोध

१३०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. गल्लीतून अगोदरच ड्रेनेजलाईन टाकण्यात आली आहे. त्यात पुन्हा एवढी मोठी जलवाहिनी टाकल्यास घरांना तडे जातील, अशी चिंता व्यक्त करीत नागरिकांनी विरोध केला होता. ही जलवाहिनी २० ऐवजी ३० फुटांच्या रस्त्यावरून टाकण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी असल्याची माहिती उपअभियंता विजय वाघ यांनी दिली.

'त्या' नागरिकांचा आता विरोध नाही

काही नागरिकांचा जलवाहिनीच्या कामाला विरोध असल्याचे समजल्याने मनपा, एमजेपीच्या अधिकाऱ्यांसह पोलिस फौजफाटा घेऊन गेलो होतो. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना ड्रेनेजलाईन, नळ जोडण्या फुटतील, येणारे-जाणारे रस्ते बंद होतील, आमच्या घरांना तडे जातील, अशी भीती होती. त्यावर नुकसान झाले तर संबंधित विभाग दुरुस्त करून देतील. उच्च न्यायालयाच्या आदेशाने समिती जलवाहिनी कामावर देखरेख ठेवत आहे. काम वेगाने सुरू आहे. शहरातील २० लाख नागरिकांसह तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढील पिढीसाठी ही योजना आहे. त्यामुळे विरोध करू नका, असे त्यांना समजावून सांगितले आहे. आता त्यांचा विरोध नाही, काम सुरू झाले आहे.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT