Dengue mosquito larvae found in 216 containers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात फैलावणारे किटकजन्य आणि साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आरोग्य विभागाकडून धडक अबेट मोहीम राबविली जात आहे. यात मंगळवारी (दि.१) ९,१७० घरांमधील ६१,८२५ कंटेनर्स तपासण्यात आले. त्यापैकी २१६ कंटेनर्स मध्ये डास अळ्या आढळून आल्याने किटकनाशक औषध फवारणी करण्यात आली.
आरोग्य विभाग, मलेरिया विभागामार्फत धडक अबेट मोहिमेचा दुसरा टप्पा १ ते ७जुलैपर्यंत आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या अधिपत्याखाली राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ संत एकनाथ रंगमंदिर येथून करण्यात आला. याप्रंसगी डॉ.पारस मंडलेचा यांनी सर्व अतिजोखमीच्या विभागात अबेटिंग तसेच एमएलओ ऑईलचा छिडकाव पावसामुळे साठलेल्या डबक्यांमध्ये करणे. घरोघरी सर्वेक्षण करणे. हस्तपत्रिका वाटप, स्टिकर्स वाटप, याद्वारे जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी १७६ मलेरिया व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत एकूण ९१७० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.
यावेळी एकूण ६१,८२५ कंटेनर्स तपासण्यात आले. त्यापैकी २१६ कंटेनर्स मध्ये डास अळ्या आढळून आल्या. यानुसार १४६ कंटेनर्स रिकामे करण्यात आले. ९४७९ घरांममध्ये टाकले अबेट मलेरिया विभागाने मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील जोखमीच्या भागांमधील घरांचे ९४७९ घरांमधील पाण्यात अबेट टाकण्यात आले. २३९४ घरांमध्ये किटकनाशक औषध फवारणी करण्यात आली. १०५१ हस्तपत्रिका वाटप करण्यात आले. ६०३ ठिकाणी स्टीकर्स लावण्यात आले.
या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या हस्ते झोन क्र ९, संत एकनाथ रंगमंदिर येथे अॅबेट मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सुराणानगर, कैलाशनगर, संजयनगर, झोन क्र. ६ मधील विठ्ठलनगर, कामगार कॉलनी, चिकलठाणा व झोन क्र. १० मधील कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मोदीनगर या भागामध्ये कर्मचाऱ्यांद्वारे सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या.