Demand for Pishore's delicious jaggery has increased due to its chemical-free natural process.
कारभारी हराळ
पिशोर : नैसर्गिक पद्धतीने तयार होणारा पिशोरचा गूळ सध्या राज्यभरात लोकप्रिय ठरत असून त्याला मोठी मागणी वाढली आहे. या गुळाची चव, सुगंध आणि केमिकलविरहित बनविण्याची पद्धत यामुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेषतः थंडीच्या दिवसांत ड्रायफ्ट लाडू, चहा, वाघरं आणि इतर पारंपरिक पदार्थांसाठी या गुळाचा वापर वाढला आहे.
शहरातील हॉटेलांमध्ये स्पेशल गुळाची चहा देणाऱ्या ठिकाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गूळ तयार करण्याची प्रक्रिया नैसर्गिक गुऱ्हाळ मालक बाळू वामन नवले यांनी सांगितले की, येथील गूळ तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केली जाते. उसाचा रस उकळून तयार होणाऱ्या गुळात कोणतेही रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत. त्यामुळे या गुळाला नैसर्गिक रंग, चव आणि सुवास प्राप्त होतो. पिशोरचा गूळ छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना जिल्ह्यांमध्ये विशेष प्रसिद्ध झाला आहे.
दसऱ्यानंतर गुन्हाळ हंगामाला सुरुवात
साधारणतः दसऱ्यानंतर गुन्हाळ हंगाम सुरू होतो आणि फेब्रुवारीपर्यंत चालतो. या काळात पिशोर परिसरात ऊसतोडणी, रस काढणी आणि गूळ निर्मिती यामुळे परिसरात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. गावातील अनेक तरुण या हंगामात गुन्हाळावर काम करून रोजगार मिळवतात.
गुणवत्तेचा आणि चवीचा ब्रँड
या गुळाची गुणवत्ता, नैसर्गिक बनविण्याची पद्धत आणि पारंपरिक चव यामुळे त्याला राज्यभरातून पसंती मिळत आहे.
ग्रामीण उपजीविकेचा आधार
पिशोर परिसरात सध्या १० ते १२ गुऱ्हाळे कार्यरत आहेत. साधारणतः १२ क्विटल ऊसापासून एक कढई (आधन) म्हणजेच १२० ते १४० किलो गूळ तयार होतो. प्रत्येक गुऱ्हाळावर १० ते ११ मजूर काम करतात. त्यात मगुळ्याफ म्हणून जो व्यक्ती असतो तो गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक असतो.
ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस थेट गुऱ्हाळांना विकतात. त्यामुळे त्यांना अधिक दर मिळतो, तर गुऱ्हाळ मालक आणि मजूर यांचीही उपजीविका भागते. ऊस हे वार्षिक पीक असून, त्यापासून साखर किंवा गुळ दोन्ही तयार केले जाऊ शकते. मात्र, साखर कारखान्यांपेक्षा गुळाला अधिक दर मिळत असल्याने सध्या अनेक शेतकरी गुऱ्हाळ व्यवसायाकडे वळत आहेत. या वाढत्या मागणीमुळे पिशोरचा गूळ उद्योग स्थानिक शेतकऱ्यांसाठी एक नवीन आर्थिक बळ ठरत आहे.