Mango pickle : खार घातलेल्या लोणच्यासाठी गृहोद्योगांना पसंती File Photo
छत्रपती संभाजीनगर

Mango pickle : खार घातलेल्या लोणच्यासाठी गृहोद्योगांना पसंती

ये रे ये रे पावसा : बाजारात लोणच्याची कैरी दाखल

पुढारी वृत्तसेवा

Demand for pickles, traditionally salted, has increased from housewives to home industries.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ये रे पावसा.... म्हणत दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात लहानापासून ते मोठ्यांपर्यंत पावसाचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. कैरी विक्रेत्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणावर कैरी आणून कैरी फोडून देण्याची देखील कामे पाऊस पडताच मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. मात्र यंदा घरी लोणचे घालण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने खार घातलेल्या लोणच्याची मागणी गृहिणींकडून गृहोद्योगांकडे वाढली आहे.

मान्सूनपूर्व पावसाचे मेच्या सुरुवातीलाच आगमन झाले. त्यामुळे या अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा कैऱ्यादेखील बाजारात कमीच प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लोणचे बनविण्यासाठी लागणारा खर्च वाढला आहे. बाजारात कैरी फोडण्यासाठी आणि कैरी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत कैरी यंदा कमी असल्याने दरात वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खर्चात भर पडणार आहे. नीलम, गावरान कैरीला मागणी सध्या बाजारात कैरी ६० ते ७० रुपये प्रति किलो विक्री केली जात आहे. तर मागच्या वर्षी प्रति किलो कैरीसाठी ५० ते ६० रुपये मोजावे लागत होते.

सध्या दरात पाच ते दहा रुपयांचा फरक पडत आहे. परंतु यात आणखी वाढ होणार आहे. तसेच कैरी फोडून देण्यासाठी १५ ते २० रुपये मोजावे लागत आहे. यंदा नीलम कैरी, गावरान कैरी, कलमी कैरी आणि लाल बागची कैरी विक्रीसाठी असून आपापल्या चवीनुसार ग्राहक लोणचे बनविण्यासाठी कैरीची मागणी करत आहे. खासकरून ज्यांना आंबट प्रकारचे लोणचे तयार करायचे आहे ते गावरान आणि नीलम कैरीची मागणी करत आहे. तसेच ज्यांना जास्त आंबट लोणचे नाही.

पारंपरिक लोणच्याची चवच न्यारी...

आजकालच्या ७० टक्के महिला वर्ग हा नोकरी करणारा आहे. त्यात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात जुनी माणसेही नाहीत की जी पारंपरिक पद्धतीने लोणचे कसे बनवयाचे हे सांगेल.

शिवाय लोणचे घातले म्हणजे त्याची निगाही राखावी लागते नाही तर ते नासते. या सर्व गोष्टींसाठी महिलांकडे वेळ नाही, अशा वेळी जिभेला पारंपरिक खार घातलेल्या लोणच्याची चवही मिळावी व लोणचे खराबही होऊ नये यासाठी महिलांनी सध्या गृहोद्योगांच्या लोणच्यांना पसंती दिली आहे. त्यामुळे गृहोद्य- ोगांनाही चांगलाच हातभार लागला आहे.

या आधी केवळ शहरी भागातून लोणच्यासाठी ऑर्डर यायच्या पण आता ग्रामीण भागातूनही लोणच्याची मागणी वाढली आहे. जुन्या पद्धतीने घातलेले लोणचे आजकाल जास्त महिलांना बनविताना येत नसल्याने गृहोद्योगांकडे मागणी वाढत आहे. कैरीचे खार घातलेले, केवळ हळद मिठाचे, गुळाचे, कारळाचे असे विविध प्रकार असून ते ३५० ते ४०० रुपये किलो आहे. तर साखर आंबा, गूळ आंबा ३०० रुपये किलो आहे.
- आरती खोजे, गृहोद्योग चालक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT