Bribe Case : सेवानिवृत्ती लाभांच्या प्रस्तावासाठी पन्नास हजारांच्या लाचेची मागणी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Bribe Case : सेवानिवृत्ती लाभांच्या प्रस्तावासाठी पन्नास हजारांच्या लाचेची मागणी

कन्नडमधील मुख्याध्यापिका, वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

Demand for a bribe of fifty thousand rupees for a retirement benefits proposal

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील संजय गांधी उर्दू हायस्कूलमधील सेवानिवृत्त लिपिकाचे 'जीपीएफ' आणि रजेचे शिल्लक राहिलेले अंदाजे ११ लाख रुपयांचे देयक मंजूर करून मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका आणि लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुख्याध्यापिका शेख नाजिया इस्माईल (५७) आणि लिपिक शेख जावेद मसोऊदिन (५५) अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे याच शाळेतून लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि रजेचे शिल्लक राहिलेले अंदाजे ११ लाख रुपयांचे देयक मिळवून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापिका शेख नाजिया इस्माईल आणि लिपिक शेख जावेद मसोऊदिन यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सेवानिवृत्त लिपिकाला ही लाच देणे योग्य वाटत नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) रीतसर तक्रार नोंदवली.

प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 'एसीबी'च्या पथकाने गुरुवारी (दि.१८) दुपारी १ वाजता संजय गांधी उर्दू हायस्कूलच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईनंतर, दोन्ही आरोपींविरुद्ध कन्नड शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT