Crime News : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कदीम पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'

दोन वेगवेगळ्या छाप्यात दोघे गजाआड ! 'नाईट्रोव्हेट-१०' च्या ९० नशाबिक गोळ्यांसह मुद्देमाल जप्त
Jalna Crime
Crime News : अमली पदार्थ विक्रेत्यांवर कदीम पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'file photo
Published on
Updated on

Jalna News: Kadim Police conduct 'surgical strike' on drug peddlers

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जुना मोंढा परिसरात अंमली आणि नशाबिक गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कदीम जालना पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शोध पथकाने (डी. बी. पथक) बुधवार, दि. १० रोजी जुना मोंढा भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून एका विशीतील तरुणासह ५० वर्षीय व्यरक्त्तीरला रंगेहात पकडले आहे. त्यां च्यााकडून मानवी मनावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित 'Nitravet-10' (नाईट्रोव्हेट-१०) कंपनीच्या एकूण २० गोळ्या आणि गोळ्या विकून कमावलेल्या हजारो रुपयांच्या रोख रकमेसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Jalna Crime
Beed Crime | नांदुरघाट येथे पोलिसांची कारवाई : अवैधरित्या गोवंशीय प्राण्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

पहिली कारवाई: पाण्याच्या टाकीजवळ २० वर्षीय तरुण जाळ्यात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार रोजी सायंकाळी कदीम जालना पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक मोंढा भागात गस्तीवर होते. याच दरम्यान सायंकाळी ५:४० वाजेच्या सुमारास मोंढा भागातील पाण्याच्या टाकीच्या आडोश्याला एक तरुण नशेच्या गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.

पोलिसांनी पंचांसह तात्काळ तेथे छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाणाऱ्या शेख अरबाज शेख हुसेन (२० वर्षे, रा. मोंढा, जालना) या तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून जागीच पकडले. त्याच्या पँटच्या खिशातून 'नाईट्रोव्हेट-१०' च्या ६० गोळ्या (किंमत ७६० रुपये) आणि ५,००० रुपयांची रोकड असा एकूण ५, ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दूसरी कारवाई: मारुती मंदिराजवळ गोळ्या फेकून पळणारा बुकी जेरबंद पाण्याच्या टाकीवरील कारवाईपूर्वी, गुन्हे शोध पथकाने जुना मोंढा भागातील मारुती मंदिराच्या आडोश्याला दुसरी मोठी कारवाई केली. सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास मारुती मंदिराच्या पाठीमागे, फ्याच्या शेडजवळ एक इसम नशाबिक गोळ्या विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Jalna Crime
Nanded Crime : नांदेडमध्ये दोन पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त

पोलिसांनी तेथे छापा टाकला असता, पोलिसांना पाहून हातातील खाकी कागदाची पुडी जमिनीवर फेकून पळून जाणाऱ्या सय्यद अन्वर सय्यद अहेमद (५० वर्षे, रा. मोंढा, जालना) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने फेकलेल्या पुडीतून 'नाईट्रोव्हेट-१०' च्या ३० गोळ्या (किंमत ३०० रुपये) आणि त्याच्या अंगझडतीतून २,५०० रुपयांची रोकड असा एकूण २,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिसांचा तपास सुरू

या दोन्ही कारवायांप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार सचिन घाईत यांच्या तक्रारीवरून आरोपी शेख अरबाज शेख हुसेन आणि सय्यद अन्वर सय्यद अहेमद या दोघांविरुद्ध अमली औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ च्या कलम २७ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक मोतिचंद तुकाराम सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विष्णु कोल्हे आणि पोलिस नाईक भगवान भुजंग या प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news