मराठवाड्यात आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा घटला pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

ITI Admission : मराठवाड्यात आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा घटला

यंदा नोंदणी ३१ हजारांवर, दोन वर्षांपूर्वी होती पन्नास हजार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी यंदा मराठवाड्यातून ३१ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी सुमारे २६ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्यक्रम नोंदविले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नोंदणीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू असून, २३ जून रोजी पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प नोंदविण्याची मुदत संपली. राज्यातील शासकीय व खासगी आयटीआयमधून ३७ विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. दहावीनंतर अल्पावधीत कौशल्याधारित शिक्षण घेऊन रोजगारक्षम होण्यासाठी विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा असतो. मात्र, यंदा नोंदणीच्या आकडेवारीत घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाड्यात ८२ शासकीय आणि ७१ खासगी आयटीआय संस्था आहेत. यातील शासकीय आयटीआयमध्ये १५ हजार ७०४ आणि खासगी आयटीआयमध्ये ७ हजार ४९६ अशी एकूण २३ हजार २०० प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. विजतंत्री (इलेक्ट्रीशियन), जोडारी (फिटर), मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिक मोटार गाडी (मेकॅनिक मोटार व्हेईकल) या व्यवसायांना विद्यार्थ्यांकडून अधिक पसंती मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, आयटीआय प्रवेशासाठीची प्राथमिक गुणवत्ता यादी २५ जून रोजी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. २६ व २७ जूनदरम्यान आक्षेप नोंदविता येतील, तर २८ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

वर्षनिहाय नोंदणी

२०२४ - ५०,०१८

२०२५ - ३५,५६१

२०२६ - ३१,४४४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT