Sambhajinagar News : एसटीच्या अधिकाऱ्यांचे वरातीमागून घोडे Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : एसटीच्या अधिकाऱ्यांचे वरातीमागून घोडे

कमी बेसिकच्या चालक-वाहकांना अतिकालीन भत्त्याच्या कर्तव्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Decision regarding overtime allowance for drivers and conductors with lower basic pay.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कमी बेसिक असलेल्या चालक-वाहकांना अतिकालीन भत्त्याचे कर्तव्य द्यावे, असे स्पष्ट आदेश असतानाही येथील अधिकारी मर्जीतील चालक-वाहकांना सोयीचे कर्तव्य देण्यात व्यस्त होते. आता कुठे अशा चालक-वाहकांची यादी बनवून त्यांना अतिकालीन भत्याचे कर्तव्य देण्याचे नियोजन करत आहेत. इतर विभाग मात्र यावर अंमलबजावणी करत आहेत. येथील अधिकारी आता जागे झाले आहेत. येथील अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

एसटीने खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी कमी बेसिक असलेल्या चालक-वाहकांना अतिकालीन भत्त्याचे कर्तव्य द्यावे, असे वरिष्ठ पातळीवरून आदेशित करण्यात आले होते. दरम्यान येथील कर्तव्य देण-ारे अधिकारी कमी बेसिकचे चालक-वाहक हे कर्तव्य करण्यास तयार नसल्याचे कारण पुढे करत आपल्या मर्जीतील चालक वाहकांना सोयीचे आणि अतिकालीन भत्याचे कर्तव्य देत होते.

यावर अनेकदा चर्चाही झाली. परंतु येथील अधिकारी कोणालाही जुमानत नव्हते. त्यामुळे काही चालक-वाहकांमध्ये नाराजीचा सूर होता. मात्र आता अशातच कमी बेसिकच्या चालक-वाहकांची यादी बनवण्यात आली असून, त्यावर अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

अद्यापही ताळमेळ बसेना

कमी बेसिकच्या वाहक चालकांची यादी बनवून त्यांना अतिकालीन भत्त्याचे कर्तव्य देण्याचे नियोजन केले आहे, परंतु अद्यापही अधिकारी, कर्तव्य देणारे अधिकारी यांच्यात ताळमेळ बसत नसल्याने अनेकांना ऐनवेळी इतर मार्गावर कर्तव्यासाठी जावे लागत आहे. अशात जास्त बेसिकच्याही चालक वाहकांना कर्तव्यावर पाठवण्यात येत आहे.

कार्यालयीन कामांसाठी वापर

कमी बेसिकचे चालक वाहक विविध मार्गांवर कर्तव्यावर पाठवणे आवश्यक असतानाही जे चालक-वाहक अधिकार्यांशी सलगी करून आहेत, असे चालक-वाहक आजही कार्यालयीन कामांसाठी वापरण्यात येत आहेत. वरिष्ठांकडून यादी बनवली असली तरी आगार पातळीवर मात्र याचे तंतोतंत पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT