Debt-ridden young farmer ends life by hanging himself
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारी झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथे घडलेली आहे. बाळचंद्र कडू कांबळे (३४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
तालुक्यातील वजनापूर शिवारातील गट क्रमांक ६८ मध्ये बाळचंद्र कांबळे हे कुटुंबासह वास्तव्यास होते. मंगळवारी रात्री १० वाजता राहत्या घरात साडीच्या साह्याने छताच्या पंख्याला बाळचंद्र कांबळे यांनी गळफास घेतला.
ही बाब त्यांचे वडील कडू कांबळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी बेशुद्धावस्थेत सिद्धनाथ वाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेची शिल्लेगाव पोलिसांत नोंद करण्यात करण्यात आली आहे.