Sambhajinagar Crime Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News: आई-वडील नव्हे हे तर सैतानच! चपात्या येत नाही म्हणून दिले मुलीच्या हाताला चटके, गच्चीवर डांबलं

Ranjangao Shenpunji Latest News: रांजणगाव शेणपुंजी येथील घटना : क्रूर आई-वडिलांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Daughter tortured by mother for not being able to make chapatis

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : लहानपणापासून आजी-आजोबांकडे राहणारी १७ वर्षीय परप्रांतीय मुलगी लॉकडाऊनमध्ये रांजणगावात रा-हणाऱ्या आई-वडिलांकडे आली होती. या दरम्यान मुलीकडून घरातील कामे करून घेताना तिला जेवायला न देणे, बाथरूम तसेच गच्चीवर राहण्यास सांगून तिला मारहाण करणे एवढेच नाही तर चपात्या नीट बनवता येत नाही म्हणून तिच्या आईने मुलीच्या हाताला चिमट्याने चटके दिले. या प्रकरणी मुलीने तक्रार दिल्याने तिच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान येथील विक्रमसिंग (नाव बदललेले आहे) हे कुटुंबासह गेल्या काही वर्षापासून रांजणगाव येथे राहतात. त्यांना तीन मुली व एका मुलगा असून तीन नंबरची मुलगी सिमा (नाव बदलले आहे) लहानपणा पासून राजस्थान येथे आजी-आजोबाकडे राहत होती. या दरम्यान तिने इयत्ता ८ वी पर्यंत शिक्षण घेतले. लॉकडाऊन लागल्याने २०१९ मध्ये ती रांजणगाव येथे राहणाऱ्या आई वडिलांकडे राहण्यास आली. तेव्हा सीमाची आई तिला घरातील कामे करायला सांगायची तसेच चपात्या नीट झाल्या नाही म्हणून ती पोटच्या मुलीला चिमट्याने चटके द्यायची. तसेच तिला जेवायला न देणे, बाथरूम व गच्चीवर राहण्यास सांगून घराबाहेर पडू न देणे. छोट्या-छोट्या कारणावरून तिला मारहाण करणे.

दरम्यान नातेवाइकाचे लग्न असल्याने घरातील सर्व जण राजस्थान येथे लग्नासाठी गेले होते. यावेळी सीमा वर्षभर तिच्या नातेवाइकांकडे राहिली. मात्र तुझे घरचे पैसे पाठवत नसल्याने आम्ही तुझे शिक्षण करू शकत नाही, असे सांगितल्याने सीमा काही दिवस दुसऱ्या नातेवाइकाकडे राहिली. त्यानंतर सीमाच्या घरच्यांनी तिला बालविकास केंद्रात टाकले होते. तेथे ती काही दिवस राहिल्यानंतर तिचे वडील व भाऊ सीमाला रांजणगाव येथे घेऊन आल्यानंतर सीमाच्या आई-वडिलांनी तिला पुन्हा त्रास देऊन मारहाण सुरू केली. दरम्यान दामिनी पथकाने सीमा तसेच तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. तेव्हा सीमाने आई-वडिलांसोबत राहण्यास नकार दिल्याने तिला बाल कल्याण समिती पुढे हजर करून सीमाला ९ जानेवारी २०२४ रोजी बालगृहात पाठविले होते.

सीमा ही आई-वडिलांकडे राहत असताना त्यांनी सीमाला मारहाण केली. तसेच तिच्या आईने चपात्या नीट येत नाही म्हणून सीमाला चटके दिले होते. या प्रकरणी १३ जुलै रोजी सीमाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तिच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुषमा पवार या करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT