Cultivation of cannabis plants in the field
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : शेतात लावलेली आठ किलो वजनाची आठ गांजाची झाडे ग्रामीण पोलिसांनी पकडली. ही कारवाई बुधवारी (दि.२७) दुपारी तालुक्यातील अंधारी येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका वीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे.
अक्षय कैलास पांडव (२०, रा. अंधारी ता. सिल्लोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाच्या शेतात गट नं.११३७ मध्ये गांजाची झाडे लावलेली आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून बुधवारी पोलिसांनी छापा मारला. यात ४२ हजार किमतीची ८ किलो गांजाची झाडे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करीत एकाला ताब्यात घेतले.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलिस हवालदार दादाराव पवार, यतीन कुलकर्णी, संजय आगे, राजेंद्र काकडे, रमेश व्यवहारे यांनी नायब तहसीलदार तुकाराम बनकर, कृषी सहायक वाणखेडे यांच्या उपस्थितीत केली. या प्रकरणी वरील तरुणाविर-ोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहे.
दरम्यान शेतात गांजाची झाडे पकडण्याची ही पहिली कारवाई नाही. यापूर्वी तालुक्यातील रेलगाव, पळशी, उपळी, धावडा, लिहाखेडी आदी गावांमध्ये पोलिसांनी कारवाया केलेल्या आहेत. मात्र तरी देखील काही शेतकरी लालसेपोटी शेतात के गांजाची झाडे लावत असल्याचे, याव कारवाईवरुन दिसून येते.
गुन्हा करणारा कितीही सराईत असला तरी एक दिवस तो पकडला जातो. यासाठी शेतकऱ्यांनी लालसेपोटी शेतात गांजाची झाडे लावू नये. एक दिवस त्याचा पर्दाफाश होतो. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी. शिवाय शेतीला जोडधंदा करावा. असे कुठलेली गुन्हेगारी कृत्य करू नये.रवींद्र ठाकरे, सहायक पोलिस निरीक्षक, सिल्लोड ग्रामीण