Twelve Jyotirlingas : बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी file photo
छत्रपती संभाजीनगर

Twelve Jyotirlingas : बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

राजस्थानी गणेश मंडळाच्या धार्मिक उपक्रमाचे कौतुक

पुढारी वृत्तसेवा

Crowd of devotees to view the display of the twelve Jyotirlingas

मंठा, पुढारी वृत्तसेवा : शहरातील देववाडा परिसरात राजस्थानी युवकांनी स्थापन केलेल्या गणेश मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेला बारा ज्योतिर्लिंगाचा आकर्षक देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. हा देखावा पाहण्यासाठी शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत असून, मंडळाच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

शहरातील 'देववाड्याचा राजा'

म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणेश मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यंदा साकारण्यात आलेला बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून, ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि देखाव्याची सजावट पाहण्यासाठी सायंकाळच्या वेळी मोठी गर्दी होत आहे. मंडळाच्या युवकांनी घेतलेल्या मेहनतीचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष तेजस कासट, यश तिवारी, उपाध्यक्ष कृष्ण मणियार, सुदर्शन भुतडा, कोषाध्यक्ष रमण दायमा, अनुराग कासट, सचिव जगदीश साबू, संकेत मणियार, सौरभदायमा, तसेच सल्लागार सोमेश चोकडा, राजू मणियार, सचिन साबू, शरद मुरख्या, शुभम दायमा, संतोष तिवारी, सुरेश भुतडा, सोनू अग्रवाल, आशिष भांगडिया, रुपेश लाखोटिया, कपिल तिवारी, वरद लाखोटिया, मधुर मणियार, रघुनंदन बियाणी, गणेश भुतडा, पार्थ साबू, समर्थ साबू, नैतिक काला यांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT