Crime News : नात्यातील मुलीशी बोलल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : नात्यातील मुलीशी बोलल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या

छातीत खुपसला चाकू; आरोपीला काही तासांत ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Young man brutally murdered out of anger for talking to a relative's girl

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आपल्या नात्यातील एका तरुणीशी बोलत असल्याच्या कारणावरून तौसिफ शमीम शेख (१९, रा. साईनगर, गल्ली क्र. ३) या तरुणाच्या डोक्यात, नाकावर सपासप वार करत थेट छातीत चाकू खुपसून त्याची निघृण हत्या केली. हा रक्तरंजित प्रकार बुधवारी (दि. १४) रात्री ११ वाजेच्या सुमारास गारखेडा परिसरातील साईनगर गल्ली क्र. ३ मध्ये घडला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या संशयित आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी बीड येथून बेड्या ठोकल्या आहेत. आदित्य अशोक शेळके (१९रा. साईनगर, गारखेडा) असे अटकेतील आरोपीचे निरीक्षक राजेंद्र मुंडे यांनी दिली.

तौसिफ आणि संशयित आदित्य हे दोघेही साईनगर भागात समोरासमोर राहणारे आहेत. मात्र, आरोपी आदित्यच्या नात्यातील एका तरुणीशी तौसिफ बोलत असल्याने दोघांमध्ये मागील काही महिन्यांपासून सातत्याने खटके उडत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, तरुणी एका कार्यक्रमात गेली तेव्हाही मयत तिच्याशी बोलताना आरोपीला दिसला.

तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास मुजम्मीर आणि तौसिफ हे नूर मशिदीच्या पाठीमागे नेहमीच्या ठिकाणी बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आदित्यने, तू माझ्या नात्यातील मुलीशी का बोलतोस ? असा जाब विचारून तौसिफसोबत जोरदार वाद घातला. मुजम्मीरने मध्यस्थी करून तौसिफला घरी जाण्यास सांगितले असता, आदित्यने तुला सोडणार नाही अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपीने ट्रॅव्हल्सने गाठले बीड

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त मनीष कल्याणकर, पुंडलिकनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे, सहायक निरीक्षक शिवप्रसाद कहऱ्हाळे, उपनिरीक्षक विनोद भालेराव, अर्जुन राऊत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आरोपी आदित्य रात्रीच एका ट्रॅव्हल्सने बीडला पळून गेला. मात्र, पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याच्या मुसक्या आवळल्या.

दुचाकीवर बसून मोबाईल पाहत असताना अचानक हल्ला

रात्री ११ वाजेच्या सुमारास तौसिफ घरासमोरील रस्त्यावर दुचाकीवर बसून मोबाईल पाहत बसला होता. बाजूलाच गल्लीतील इतर मुले बसलेली होती. त्यावेळी आदित्य अचानक धारदार चाकू घेऊन आला आणि काही समजण्याच्या आत त्याने तौसिफच्या छातीत खुसपला. तौसिफ रक्ताच्या थारोळ्यात खाली पडताच आदित्यने त्याच्या नाकावर आणि डोक्यावरही सपासप वार केले आणि पळ काढला. मित्रांनी तौसिफ़ला एमजीएममध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ मुजम्मीर जमील शेख (२०, याने दिलेल्या तक्रारीवरून आदित्यविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक निरीक्षक कऱ्हाळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT