Crime News : 'पार्टी दे, नाहीतर संपवतो'; अल्पवयीनने मित्राच्या छातीत खुपसला चाकू file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : 'पार्टी दे, नाहीतर संपवतो'; अल्पवयीनने मित्राच्या छातीत खुपसला चाकू

हर्सूल पोलिस ठाण्यात अल्पवयीनसह चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Crime News: 'Give me a party, or I'll finish you off'; Minor stabs friend in chest

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खूप दिवस झाले पार्टी दिली नाही, आज पार्टी दे नाहीतर इथेच खतम करतो अशी धमकी देत सय्यद फैजान सय्यद इम्रान (१८, रा. जहांगीर कॉलनी, हसूल) याला मित्रानेच छातीत चाकू खुपसला. त्यानंतर उपचारासाठी घाटीत घेऊन जाण्याचा बहाणा करत दुचाकीवर बसवून रेल्वे स्टेशन भागात नेऊन फैजानच्या डोळ्यात व पाठीवर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा थरार शनिवारी (दि. १०) सायंकाळी ५ वाजता हर्सल परिसरातील एकतानगर आणि रेल्वे स्थानकाजवळील हमालवाडा भागात घडला. याप्रकरणी हर्सल ठाण्यात एका अल्पवयीनसह त्याच्या तीन साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी जखमीचे वडील सय्यद इम्रान सय्यद गफूर (३७) यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फैजान हा कपडे खरेदी करण्यासाठी जहांगीर कॉलनीतून सिटीचौककडे पायी जात होता. हर्मूल येथील एकतानगर परिसरातील सानिया मेडिकलजवळ त्याचा एक अल्पवयीन मित्र थांबलेला होता. त्याने फैजानला जवळ बोलावून खूप दिवस झाले पार्टी नाही काही नाही, पार्टी दे अशी मागणी केली. त्यावर फैजानने सध्या पार्टी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने अल्पवयीन आरोपीने शिवीगाळ करत, साल्या पार्टी दे, नाहीतर तुला इथेच खतम करून टाकतो अशी धमकी दिली आणि अचानक चाकू काढून फैजानच्या छातीत खुपसला.

उपचाराच्या बहाण्याने नेले; डोळ्यात केला वार

फैजानच्या छातीतून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहू लागले. त्यावेळी आरोपीने तुझ्या छातीत जखम झाली आहे, तुला घाटी दवाखान्यात घेऊन जातो असे सांगत अल्पवयीन आरोपी व त्याच्या इतर तीन मित्रांनी फैजानला दुचाकीवर बसवले.

मात्र, घाटीत नेण्याऐवजी थेट रेल्वे स्टेशनजवळील हमालवाडाच्या मोकळ्या मैदानात नेले. तिथे चौघांनी फैजानला खाली पाडून मारहाण केली आणि पार्टी का देत नाही? असा जाब विचारत त्याच्या उजव्या डोळ्यात चाकूने वार केला. तसेच त्याच्या पाठीवर व शरीरावर इतर ठिकाणी वार करून रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच सोडून चौघेही पसार झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT