Food Adulteration : मंगळागौरीच्या खेळात अन्न भेसळीविषयक जनजागृती file photo
छत्रपती संभाजीनगर

Food Adulteration : मंगळागौरीच्या खेळात अन्न भेसळीविषयक जनजागृती

सून म्हणते पनीरची भाजी करू का तर सासूबाई म्हणतात नको नको पनीर भेसळयुक्त आहे, तू मस्त पैकी पिठलं भाकरी कर....

पुढारी वृत्तसेवा

Creating public awareness about food adulteration through Mangalagaur games

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सून म्हणते पनीरची भाजी करू का तर सासूबाई म्हणतात नको नको पनीर भेसळयुक्त आहे, तू मस्त पैकी पिठलं भाकरी कर.... खुर्ची का मिर्ची जाशील कैसी सासरे बोलवतात....., सासरे म्हणतात मी फिरायला जाऊन येतो तर सून म्हणते नको नको सगळीकडे खड्डे आहेत. तुम्ही बाहेर जाऊ नका... खुर्ची का मिर्ची जाशील कैसी....... असे गीत सादर करत सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत एन-४, सिडकोत वैष्णवी मंगळागौरी ग्रुपतर्फे मंगळागौरचे खेळ सादर करण्यात आले.

यावेळी फुगडया, झिम्मा, पिंगा, लाट्या बाई लाट्या, फुल पाखरू, हटूष पान बाई हटुश असे विविध पारंपरिक खेळ खेळण्यात आले. तसेच. खुर्ची का मिर्ची या गाण्यामध्ये अन्नभेसळ, रस्त्यावरील खड्डे याविषक जनजागृती केली. या खेळांमध्ये स्वाती कुलकर्णी, कल्पना कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी, पूजा कुलकर्णी, सुजाता नाईक, आरती पाठक, स्वप्ना कार्लेकर, शिल्पा श्रोत्रे, भावना कुडे यांचा सहभाग होता-

पारंपरिक खेळांना सामाजिक संदेशाची जोड

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांच्या माध्यमातून महिलांनी अन्नभेसळ, रस्त्यांवरील खड्डे यांसारख्या दैनंदिन समस्यांवर जनजागृती केली. 'खुर्ची का मिर्ची' या गाण्यातून पनीरमधील भेसळ आणि खड्यांबाबत विनोदी पद्धतीने संदेश देण्यात आला. फुगडी, झिम्मा, पिंगा, लाट्या बाई लाट्या आदी खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT