Sambhajinagar News : महागाईविरोधात भाकप, माकपची निदर्शने file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : महागाईविरोधात भाकप, माकपची निदर्शने

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशभरात महागाईविरोधात सोमवारी निदर्शने करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

CPI and CPI(M) hold protests against inflation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे सोमवारी (दि.१) पैठणगेट येथे निदर्शने करण्यात आली.

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशभरात महागाईविरोधात सोमवारी निदर्शने करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून पैठणगेट येथे झालेल्या निदर्शनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व - नागरिक सहभागी झाले होते. इराण व रशियाकडून स्वस्तात इंधन घेतलेच पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव दिलाच पाहिजे, अदानी-अंबानीसाठी काम करणारे सरकार मुर्दाबाद, जनतेवर महागाई लादणारे सरकार मुर्दाबाद, गरिबांच्या पोटावर लाथ मारणारे सरकार मुर्दाबाद आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी भाकपचे जिल्हा सेक्रेटरी अॅड. अभय टाकसाळ, माकपचे भगवान भोजने, अॅड. एस.आर. बोधडे, प्रा. उमाकांत राठोड, वसीम खान सिकंदर खान, अनिता हिवराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विकास गायकवाड, अॅड. उमेश इंगळे, शेख अमजद शेख पाशु, राजू हिवराळे, रफिक बक्ष, जफर खान फजलू रहमान खान, मनिषा भोळे, शालू कांबळे, कॉ. शिला दिवे, सुनिता लोंढे आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT