कोरोनाने माणसे वाचली; माणुसकी मात्र मृत्यू शय्येवर file photo
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाने माणसे वाचली; माणुसकी मात्र मृत्यू शय्येवर

सामाजिक कार्यकर्त्या आशा मस्के: स्त्री अभ्यास केंद्रात संवाद

पुढारी वृत्तसेवा

Corona saved people; humanity is on its deathbed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महासंकटात महाप्रयासाने माणसे वाचली, माणुसकी मात्र मृत्यू शय्येवरच असून, अखेरच्या घटका मोजत आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या आशा मिलिंद मस्के यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त तसेच सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (दि.१०) विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तसेच यानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर्स व रिल्स स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या आशा मस्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. केंद्राच्या संचालक डॉ. पुष्पा गायकवाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. अश्विनी मोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

म्हस्के पुढे म्हणाल्या की, महिलांनी कोणतेही काम निडर होऊन करावे. आम्ही बेवारस मृतदेहांचा अंत्यविधी करण्याचे काम हाती घेतले ते अविरत सुरू आहे. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. रिल्स स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक अनुक्रमे सोनाली चुंगडे, दत्तप्रसाद मेहरकर, संस्कृती खंदारे व आस्था रोडे यांना मिळाले. तसेच भित्तिपत्रक पोस्टर-प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे अश्विनी डोळस, दिक्षा शिनगारे, समिक्षा लोखंडे, सवित्रा वाकळे यांना देण्यात आले.

अध्यक्षीय समारोप डॉ. पुष्पा गायकवाड यांनी केला. यावेळी प्रा. डॉ. प्रवीना पवार, प्रा. अनुसूया चव्हाण, प्रा. गिरीबाला बोदले यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता बहिरट यांनी तर आभार डॉ. अश्विनी मोरे यांनी मानले.

बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचे कार्य

सामाजिक कार्यकर्त्या आशा मस्के या गेल्या काही वर्षांपासून बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचे कार्य करत आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी अनेक बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करून माणुसकीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT