Sambhajinagar News : दिव्यांगांचे मनपासमोर ठिय्या आंदोलन

१४ महिन्यांपासून थकीत निर्वाह भत्त्याची मागणी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : दिव्यांगांचे मनपासमोर ठिय्या आंदोलनfile photo
Published on
Updated on

Disabled people protest in front of the Municipal Corporation

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : गेल्या १४ महिन्यांपासून महापालिकेकडून मिळणारा निर्वाह भत्ता थकला असल्याने बुधवारी (दि.११) शहरातील संतप्त दिव्यांग बांधवांनी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

Sambhajinagar News
Sambhajinagar Accident News : दुचाकी झाडावर आदळून तरुण ठार

दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनामुळे काही वेळ महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. अखेर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी प्रशासनाशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून भत्ता लवकरच देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील दिव्यांग बांधवांना महापालिकेकडून निर्वाह भत्ता दिला जातो. मात्र मागील १४ महिन्यांपासून हा भत्ता मिळालेला नसल्याची तक्रार दिव्यांग नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात विविध दिव्यांग संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता; परंतु प्रत्येक वेळी केवळ आश्वासनेच देण्यात आली. प्रत्यक्षात भत्ता न मिळाल्याने दिव्यांगांमध्ये मोठी नाराजी होती. दरम्यान, एमआयएमच्या दिव्यांग सेलतर्फे मनपा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

Sambhajinagar News
Sambhajinagar Accident News : दुचाकी झाडावर आदळून तरुण ठार

यावेळी मोहसीन खान, अब्द-ल्ला शेख, रहीम खान, सईद खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला आणि दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news