Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : ब्लॅकलिस्टच्या इशाऱ्यानंतर कंत्राटदार उपोषणाच्या तयारीत

मनपा कर्मचारी मारहाण प्रकरण, सोमवारपासून काम बंद

पुढारी वृत्तसेवा

Contractor Prepares for Hunger Strike Following Blacklisting Warning

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका लेखा विभागात कार्यरत असलेले अभिषेक ढेकळे यांना तीन-चार दिवसांपूर्वी कंत्राटदार मुबारक पठाण यांनी थकीत बिलासाठी धक्काबुक्की, मारहाण करीत शिवीगाळ केली.

या घटनेनंतर महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आयुक्तांनी ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे कंत्राटदार संघटनांनी एकत्र येत कामबंदसह महापालिकेसमोर उपोषण करण्याची तयारी केली आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने मागील दोन दशकांपासून लेखा विभागात विकासकामांच्या देयकांची वेटिंगलिस्ट सुरू आहे. तर मागील दहा वर्षांत महापालिकेवर कर्जाचे ओझे वाढल्याने सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची देयके देण्यासाठी देखील प्रशासनाने वेटिंगलिस्ट तयार केली आहे.

या ज्येष्ठता यादीनुसार देखके देण्याचे काम सुरू आहे. त्यात चार दिवसांपूर्वी कंत्राटदार पठाण लेखा विभागात गेले. त्यांनी आपल्या कामाच्या देयकाची संचिका कुठे आहे, अद्याप संचिका मंजूर का झाली नाही, अशी विचारणा ढेकळे यांच्याकडे केली. त्यावरून दोघांमध्ये काही वाद होऊन त्याचे रूपांतर भांडणात झाले.

अखेर पठाण यांनी ढेकळे यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. याप्रकरणी महापालिकेच्या वतीने सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार कंत्राटदार पठाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन दिले.

त्यानंतर आयुक्तांनी संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देताच कंत्राटदार संघटना एकजूट झाली. शुक्रवारी कंत्राटदारांच्या शिष्टमंडळाने आयुक्त येडगे यांची भेट घेत निवेदन दिले. यात लेखा विभागातील भ्रष्टाचारासह टक्केवारीबाबत निवेदन दिले. या प्रकरणाची चौकशी करा नसता २५ मे पासून मनपासमोर उपोषण सुरू करू, असा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT