कंटेनर-ट्रॅव्हलचा भीषण अपघात 
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : कंटेनर-ट्रॅव्हलचा भीषण अपघात; २० जखमी

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. या महामार्गावर वैजापूरजवळ बुधवारी (दि.९) पहाटे पाच वाजता कंटेनर व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात २० जण जखमी असून चौघांची स्थिती गंभीर आहे. अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी पहाटे समृद्धी महामार्गावरील वैजापूर जवळ संभाजीनगरकडून शिर्डीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सचे नियंत्रण सुटल्याने तिची कंटेनरला पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात ट्रॅव्हल्स बसमधील २० प्रवासी जखमी असून चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हालविण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT