Sambhajinagar bribe Case : एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातच हवालदार लाच घेताना पडकला  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar bribe Case : एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातच हवालदार लाच घेताना पडकला

गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतले पाच हजार

पुढारी वृत्तसेवा

Constable caught taking bribe at MIDC CIDCO police station

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात बी फायनल करण्यासाठी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातील हवालदार पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला ही कारवाई रविवारी (दि.३१) जालना येथील एसीबीच्या पथकाने (५४) असे लाच घेणाऱ्या हवालदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात कलम १२३ व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद आहे. १४ ऑगस्टला तपास अधिकारी उपनिरीक्षक मुंढे यांनी तक्रारदाराला ठाण्यात बोलावले. तेव्हा त्याची आरोपी हवालदार हैदर शेख सोबत भेट झाली.

हैदर यांनी पीएसआय मुंढे व तक्रारदार यांची चिकलठाणा विमानतळ पार्किंगमध्ये भेट घालून दिली. त्यावेळी तक्रारदारावर दाखल गुन्ह्यात बी फायनल करण्यासाठी पीएसआय मुंढे यांनी तक्रारद-ाराकडे ३० हजारांची लाच मागणी करून तडजोडीअंती २० हजार घेण्याचे मान्य केले. त्यानंतर १८ ऑगस्टला मुंढे यांच्या सांगण्यावरून हैदर शेखकडे तक्रारदाराने १० हजार दिले. उर्वरित पैशाची दहा ते पंधरा दिवसांत सोय करतो, असे सांगितले. तेव्हा हैदर शेखने पैशाची सोय झाल्यावर बाकी राहिलेले साक्षीदार जबाबासाठी घेऊन या व तेव्हा राहिलेले दहा हजार रुपये देऊन टाका, असे सांगितले. तक्रारदाराने जालना येथील एसीबीकडे तक्रार केली.

पीएसआयकडून लाचेचा उल्लेख नाही

रविवारी एसीबीने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सापळा लावून पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार पंचासोबत पीए-सआय मुंढे यांच्याकडे गेला. तेव्हा मुंढे व तक्रारदारात गुन्ह्याच्या अनुषंगाने बोलणे झाले, परंतु मुंढे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली नाही.

लाचेच्या रकमेतील उर्वरित ५ हजार घेताना पडकला

तपास अधिकारी पीएसआय मुंढे यांना भेटल्यानंतर तक्रारदार हवालदार हैदर शेखकडे गेले. शेखने गुन्ह्याचे बी फायनल करण्यासाठी तडजोडी अंती १५ हजार लाचेची रक्कम ठरवून पूर्वी स्वीकारलेले १० हजार मान्य करून उर्वरित ५ हजार स्वीकारताच पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर, अंमलदार गजानन घायवट, गजेंद्र भुतेकर, गजानन कांबळे, मनोहर भुतेकर, अशोक राऊत यांच्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT