एफआरपी न भरल्याचा फटका; सचिन घायाळ शुगरच्या मालमत्तेचा लिलाव file photo
छत्रपती संभाजीनगर

Paithan News : एफआरपी न भरल्याचा फटका; सचिन घायाळ शुगरच्या मालमत्तेचा लिलाव

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कंपनीची जप्त मालमत्ता शुक्रवारी पैठण तहसील कार्यालयात जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

Consequences of non-payment of FRP; auction of Sachin Ghayal Sugar's assets

पैठण, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना करार पद्धतीवर चालविणाऱ्या सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सन २०२५-२६ च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची १९ कोटी ४९ लाख २७हजार रुपयांची एफआरपी थकविल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कंपनीची जप्त मालमत्ता शुक्रवारी पैठण तहसील कार्यालयात जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

एफआरपीची थकबाकी न भरल्यामुळे कंपनीची साखर, टायरयुक्त बैलगाड्या, विनाटायर बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच मोलॅसिस जप्त करण्यात आले होते. या जप्त मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया तहसीलदार ज्योती पवार आणि नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांच्या उपस्थितीत पार पडली.

लिलावात आठ बोलीदारांनी सहभाग घेतला. यामध्ये यश कन्स्ट्रक्शन सप्लायर्स, अहिल्यानगर यांनी सर्वाधिक बोली लावत साखर ५ कोटी ३७ लाख ८२ हजार रुपये, टायरयुक्त बैलगाड्या १ कोटी ८१ लाख २४ हजार रुपये आणि विनाटायर बैलगाड्या ९० लाख ७२ हजार रुपये, अशी एकूण ८ कोटी ९ लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केली. यावेळी दीपक मोरे, सचिन घायाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT