Dharur Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : एसटी बस लॉक करून वाहकाची बॅग पळवली

तिकीट मशिनसह ३७ हजारांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

Conductor's bag stolen after locking the ST bus

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात रात्री बसमध्ये झोपलेल्या एका एसटी वाहकाची (कंडक्टर) बॅग चोरट्याने लंपास केली. ही घटना मंगळवारी (दि.१४) रात्री १० ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. या बॅगेत एसटी महामंडळाचे २५ हजार रुपयांचे तिकीट मशीन, मोबाईल आणि रोख रकमेसह ३७ हजार ७०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी बुधवारी (दि. १५) क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महेंद्र यशवंत चौधरी (४२, रा. कापडणे, ता. जि. धुळे) हे धुळे आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी रात्री ते एसटी बसने छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकात आले होते.

रात्री १० वाजेच्या सुमारास बसस्थानकात गाडी उभी करून ते आणि त्यांचे सहकारी बसचे दरवाजे आणि खिडक्या आतून लॉक करून बसमध्येच झोपी गेले होते. झोपण्यापूर्वी त्यांनी बॅग बाजूलाच ठेवली होती.

मध्यरात्री चोरट्याने बसमध्ये शिरून तिकीट मशीन, चार्जर, मोबाईल, पॉवर बँक, पाकीट, ज्यामध्ये वाहकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स आणि ७०० रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. पुढील तपास हवालदार इरफान खान करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT