Marathwada smart bus shelters project : मराठवाड्याचा प्रवास आता स्मार्ट; 15 कोटींतून उभारणार 75 बस निवारे

आठ जिल्ह्यांत अत्याधुनिक शेल्टरचा धडाका
ST Bus
ST Bus Pudhari
Published on
Updated on

परभणी : मराठवाड्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 15 कोटी रुपयांच्या निधीतून विभागातील 8 जिल्ह्यांमध्ये 75 अत्याधुनिक स्मार्ट बस शेल्टर उभारणीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि इतर प्रतिकूल परिस्थितीत तासनतास बसची प्रतीक्षा करणाऱ्या ग्रामीण प्रवाशांना आता सुरक्षित व सुसज्ज थांबा उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक निवाऱ्यावर 20 लाखांचा खर्च

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत प्रत्येक बस निवाऱ्यासाठी सुमारे 20 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे निवारे केवळ निवारे नसून ते पूर्णपणे अत्याधुनिक असतील. यामध्ये मजबूत लोखंडी संरचना, स्टेनलेस स्टील व एमएस शीटचे छप्पर, आकर्षक काच पॅनल, बसण्यासाठी आरामदायी बाके, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि रात्रीच्या वेळी पुरेशी वीज सुविधा असणार आहे. काही ठिकाणी लहान व्यावसायिक स्टॉल्सलाही परवानगी दिली जाणार असून, त्यातून स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

ST Bus
मराठवाड्यातील दळणवळण 'रिझर्व्ह' वर

या प्रकल्पासाठी शासनाने कडक अटी घातल्या आहेत. वास्तुविशारदांची मंजुरी आणि कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मान्यता घेतल्याशिवाय काम सुरू करता येणार नाही. तसेच 10 जानेवारी 2014 च्या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांनुसार हे काम पार पाडले जाईल. जुन्या मोडकळीस आलेल्या निवाऱ्यांचे पाडकामही याच निधीतून केले जाणार आहे.

एस.टी. महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीत मोठी भर पडणार असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

ST Bus
Chatrapati Sambhajinagar industry crisis : छत्रपती संभाजीनगरात 90 टक्के कंपन्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार!

असा आहे जिल्हानिहाय विस्तार :

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल टी पॉईंट, साखर कारखाना (पैठण), लिंबेजळगाव, जुने कायगाव, वेरूळ लेणी, सोयगावसह 15 ठिकाणे.

परभणी व हिंगोली : झरी, राणीसावरगाव, पालम, झिरो फाटा आणि जवळा बाजार.

बीड : बर्दापूर फाटा, लोखंडी सावरगाव, येळंब घाट, अंमळनेरसह 15 महत्त्वाची ठिकाणे.

लातूर : रेणापूर फाटा, हाळोळती, वलांडी, घोणसीसह 10 ठिकाणे.

धाराशिव : कुंथलगिरी, मुरूम फाटा, तडवाळे, पारगावसह 10 ठिकाणे.

नांदेड : माळेगाव, निवघा, उस्माननगर फाटा, मारताळासह 10 ठिकाणे.

जालना : रामनगर, वाटूर फाटा, केदारखेडा आणि तळणी परिसर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news