Sambhajinagar News : जॉगिंगदरम्यान आयुक्तांचा स्वच्छतेवर वॉच, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर केली कारवाई file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : जॉगिंगदरम्यान आयुक्तांचा स्वच्छतेवर वॉच, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर केली कारवाई

नागरिकाला दिला स्वच्छतेचा धडा, ३ हजारांचा दंड : धूम्रपान करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यालाही नोटीस

पुढारी वृत्तसेवा

Commissioner's watch on cleanliness during jogging, action taken against those throwing garbage on the road

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि.३) सकाळच्या जॉगिंगदरम्यान ब्रिजवाडी चौक, उत्तरानगरी आणि एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील स्वच्छता व्यवस्थेची अचानक पाहणी केली. यावेळी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एका नागरिकाला प्रथम कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर संबंधितावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. झोन क्रमांक ५ च्या पथकाने क्लीन स्ट्रीट अॅपच्या माध्यमातून संबंधिताकडून ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी सकाळी जॉगिंगदरम्यान ब्रिजवाडी चौक, उत्तरानगरी आणि एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील स्वच्छता व्यवस्थेची अचानक पाहणी केली. यापाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांना घरातील कचरा ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनिटरी अशा चार प्रकारांत वर्गीकृत करूनच घंटागाडीत देण्याचे आवाहन केले.

तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याचवेळी महापालिकेचा एक कर्मचारी धूम्रपान करताना आढळून आला. संबंधित कर्मचाऱ्याला सुधारणा करण्याच्या उद्देशाने नोटीस बजावण्यात आली.

१०० टक्के कचरा वर्गीकरणावर भर

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी आणि आयईसी पथकाला शंभर टक्के कचरा संकलन व वर्गीकरण सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. यासह प्रत्येक नागरिकाने घरातील कचरा चार प्रकारांत वर्गीकृत करूनच घंटागाडीत द्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळून स्वच्छ, सुंदर व हरित छत्रपती संभाजीनगर अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT