Sambhajinagar News file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शहर पोलिसांची 'पाहिजे-फरार' विशेष मोहीम; तब्बल २८९ गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

गुन्हे शाखेसह पोलिस ठाण्यांची २३ विशेष पथके मैदानात

पुढारी वृत्तसेवा

City police launch special 'wanted/absconding' drive; apprehend 289 criminals

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विविध गंभीर गुन्ह्यांत सहभागी होऊन तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान पोलिसांना गुंगारा देत पसार झालेल्या गुन्हेगारांविरुद्ध शहर पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या 'पाहिजे-फरार' विशेष मोहिमेत पोलिसांनी तब्बल २१४ 'पाहिजे' आणि ७५ 'फरार' अशा २८९ आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. या मोहिमेत सिटी चौक ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील मागील तब्बल १० वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला बेड्या ठोकळ्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी बुधवारी (दि.१८) दिली.

आयुक्तालयाच्या हद्दीत १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुन्हे शाखेची ६ पथके आणि पोलिस ठाणे स्तरावरील १७ पथके अशी एकूण २३ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या सर्व पथकांमध्ये २३ पोलिस अधिकारी आणि ८४ अंमलदारांची नियुक्ती केली आहे.

या विशेष करण्यात आली आहे. पथकांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाची सांगड घालत it २१४ पाहिजे आरोपी आणि ७५ फरार आरोपींना शोधून काढत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे एका जुन्या गुन्ह्याचा छडा लावला. सिटी चौक पोलिस ठाण्यात सन २०१६ मध्ये दाखल झालेल्या फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी शेख मुस्तार शेख रसुल हा मागील १० वर्षांपासून फरार होता.

पोलिस गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याला अटक केली. गुन्हे करून कायद्यापासून पळ काढणाऱ्या पाहिजे व फरार आरोपींविरुद्ध अशा प्रकारची विशेष मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विविध गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व फरार असलेल्या आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिस आयुक्तालय येथील गुन्हे शाखा कार्यालयात निर्भयपणे संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT