महापुरुषांच्या अवमानाविरोधात शिवप्रेमींचा एल्गार; पोलिस आयुक्तांना देणार निवेदन file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : महापुरुषांच्या अवमानाविरोधात शिवप्रेमींचा एल्गार; पोलिस आयुक्तांना देणार निवेदन

महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानाच्या घटनांविरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वैचारिक, कायदेशीर आणि रस्त्यावर लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

पुढारी वृत्तसेवा

Citizens' Uprising Against the Insult of Great Personalities; Will submit a statement to the Police Commissioner

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानाच्या घटनांविरोधात शिवप्रेमी आक्रमक झाले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वैचारिक, कायदेशीर आणि रस्त्यावर लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शनिवारी (दि.२) शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत विविध मुद्द्द्यांवर सविस्तर चर्चा करत ठराव मंजूर करण्यात आले. प्रामुख्याने बैठकीत सर्व जाती-धर्मीयांनी एकत्र येत येत्या मंगळवारी (दि.५) दुपारी तीन वाजता पोलिस आयुक्तांना निवेदन देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

याप्रसंगी बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात येत्या ८ ते १५ दिवसांत भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देत, भविष्यात व्यापक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे स्वतंत्र कडक कायदा करण्याची मागणी करण्यात आली.

इतिहास लेखनात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात झालेल्या चुका निदर्शनास आणून देत, सर्व ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे अधिकृत शिवचरित्र सरकारने प्रकाशित करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच मराठा इतिहास संशोधन समिती स्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

बैठकीत बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री यांच्या मराठवाड्यातील कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. एनसीआरटीमधून वगळण्यात आलेले नकाशे पुन्हा समाविष्ट करावेत, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात बदल करावेत, तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या अवमानाविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शेवटी सर्व ठराव मंजूर करण्यात आले. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अत्याचाग्रस्त तीन वर्षीय चिमुकली आणि राहुल बनसोड यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शेकडो शिवप्रेमींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT