सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले चोरटे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar theft : एकाच रात्री चार बंद घरे फोडली; सिडको वाळूज महानगरातील घटना

घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात चोरट्यांनी एकाच सोसायटीमधील तीन, तर लगतच्या सोसायटीमधील एक बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णदेव कासुर्डे (रा. सियाराम हौसिंग सोसायटी, सिडको वाळूज महानगर-१) हे वाळूज येथील गुडईअर कंपनीत कामाला आहेत. १८ सप्टेंबर रोजी घराला कुलूप लावून ते कुटुंबासह गौरीपूजनासाठी त्यांच्या मूळ गावी सातारा जिल्ह्यातील पसरणी येथे गेले होते. शनिवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास सोसायटीत घुसलेल्या तिघा चोरट्यांनी कासुर्डे यांचे बंद घर फोडले. घरातील लाकडी पेटीमधील साडेसात ग्रॅमची ठुशी, पावणेदोन ग्रॅमची नथ, ४० ग्रॅम वजनाचा चांदीचा करंडा आणि साडेचार हजार रुपये रोख, असा ऐवज चोरून नेला.

यानंतर चोरट्यांनी याच सोसायटीत राहणाऱ्या भगीरथ तौर यांचे बंद घर फोडून साडेतीन ग्रॅमची नथ, तीन-चार मणी, नऊ भार वजनाचा चांदीचा आकडा आणि चार हजार रुपये रोख लंपास केले. त्यानंतर महेश घुगे यांचेही बंद घर फोडले. मात्र, तेथून चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. चोरट्यांनी सियाराम हौसिंग सोसायटीत चोरी करण्यापूर्वी लगतच्या लोटस रेसिडेन्सीमध्ये पहाटे तीनच्या सुमारास किशन नवले यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. घरातून चांदीचा कमरपट्टा, पायातील चैन आणि आठ ते दहा हजार रुपये रोख चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळी सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, डोक्यात टोपी आणि तोंडाला रुमाल बांधलेले तीन चोरटे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद

कैद झाले आहेत. पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला डोक्यात टोपी आणि तोंडाला रुमाल बांधलेले तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT