Water Supply : सिडकोला १५०० च्या जलवाहिनीतून होणार पुरवठा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Water Supply : सिडकोला १५०० च्या जलवाहिनीतून होणार पुरवठा

वाढीव पाण्याचे नियोजन सुरू, सर्व वसाहतींचे गॅप एकसाखरेच होणार

पुढारी वृत्तसेवा

CIDCO to receive supply from the 1500 mm water pipeline

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नव्या २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून १२ जूनपासून वाढीव ४० एमएलडी पाणी सुरू होणार आहे. तसेच ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून १८ एमएलडी पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे या ५८ एमएलडी वाढीव पाण्याचा वापर करून सर्व वसाहतींतील पाण्याचे टप्पे एक समान करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी शुक्रवारी (दि. २२) दिली. त्यासाठी सिडको भागाला नव्या १५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून वाढीव पाणी देऊन जुनी सिडकोची एक्स्प्रेस जलवाहिनी पुंडलिकनगर व इतर भागाला वळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीने शहराला वाढीव २०० एमएलडी पाणी येत्या १२ जूनपासून देण्यादृष्टीने काम सुरू केले आहे. यात अगोदर ४० एमएलडी पाणी एमबीआरमधून शहराल आणले जाणार आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त येडगे म्हणाले की, १५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून शहरात हे पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे.

त्यादृष्टीने या जलवाहिनीवर आवश्यक असलेली सर्व जॉइंटसह शिल्लक असलेले गॅप जोडण्याचे काम सुरू आहे. सिडकोला देखील या १५०० मि.मी.च्या जलवाहिनीतूनच आवश्यक वाढीव पाणी देण्यात येणार आहे. तर सिडकोसाठी जी एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली होती. त्यातून आता सिडकोऐवजी पुंडलिकनगर व इतर भागांचे पाणी वाढविले जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

ते म्हणाले की, सध्या झोन ३ मधील वसाहतींना आठव्या, नवव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. तर झोन ४ आणि ५ मधील वसाहतींना पाचव्या सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू केल्याने त्यातून शहरात वाढीव १८ एमएलडी पाणी येत आहे. तर नवीन जलवाहिनीतून येत्या १२ जूनपासून वाढीव ४० एमएलडी मिळेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या ५८ एमएलडी वाढीव पाण्याद्वारे सर्वप्रथम शहरातील सर्व वसाहतींतील पाण्याचे टप्पे एकसमान करण्यात येणार आहे. त्यानुसार जेथे ९ व्या दिवशी पाणी मिळणाऱ्या वसाहतींना पाचव्या-सहाव्या दिवशी मिळेल. त्यामुळे किमान २ ते ३ दिवसांनी गॅप कमी होतील, असेही ते म्हणाले.

१० जलकुंभांची जोडणी पूर्ण

१५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी जुन्या नव्या १० जलकुंभांना जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. यात हसूल जेल, हरसिद्धीमाता, हिमायतबाग, टीव्ही सेंटर-३ हे नवे आणि जुने एन ५, एन ६ आणि एन ७ येथील सहा जलकुंभांचा समावेश आहे.

नो नेटवर्कचाही विचार

वाढीव २०० एमएलडी पाण्यातून सर्व प्रथम गॅप कमी केले जाणार आहे. त्यानंतर नो नेटवर्क भागांना पाणी देण्याच्या दृष्टीने विचार होणार आहे. यात नक्षत्रवाडी, कांचनवाडीचा काही भाग आणि सातारा-देवळाईतील वसाहतींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT