Chhatrapati Sambhajinagar CBG Project pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar CBG Project : कचऱ्यापासून गॅस निर्मितीला बीपीसीएलची तयारी; दररोज २०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया

येत्या मंगळवारी महापालिका आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये अंतिम बैठक होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात ओल्या कचऱ्याची निर्मिती होते. या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मितीसाठी महापालिकेने तयारी सुरू केली असून यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने दररोज सुमारे २०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून गॅस निर्मितीची तयारी दर्शविली आहे. येत्या मंगळवारी महापालिका आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये अंतिम बैठक होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. त्यासोबतच प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यानंतर पुढील कार्यवाहीला वेग येईल, असेही ते म्हणाले.

शहरात दररोज सुमारे ६०० टनहून अधिकप्रमाणात कचरा डोअरटू डोअर प्रक्रियेतून संकलित होतो. त्यावेतेरिक्त शहराच्या विविध भागातून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला मोठ्याप्रमाणात कचरा उचलून तो शहरालगतच्या चारही कचरा प्रक्रिया प्रकल्पात आणण्यात येतो. विशेष म्हणजे शहरालगत उभारण्यात आलेल्या पडेगाव, चिकलठाणा, हर्सल या तीनही प्रकल्पांची क्षमता प्रत्येकी १५० टन आहे. त्यानुसार या तिन्ही प्रकल्पांमध्ये दररोज ४५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. तर हॉटेल आणि घराघरातून निघणाऱ्या ओल्या कचऱ्यासाठी कांचनवाडीत प्रकल्प उभारण्यात आला आहे.

या प्रकल्पात केवळ ३५ टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जाते. सध्या पडेगाव कचरा डेपोमध्ये शहरातील सर्वाधिक कचरा प्रक्रियेविनाच पडून आहे. त्यातून मोठ्याप्रमाणात दुर्गंधी निर्माण होऊन परिसरात पसरत आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील कचरा संकलनाचे काम गुजरातमधील कंपनीकडे सोपविल्यानंतर संकलित होणाऱ्या कचऱ्यात दररोज सुमारे १०० टनांनी वाढ झाली आहे. प्रक्रिय प्रकल्पात ४५० टन कचर्यावर प्रक्रिया करता येणे शक्य आहे त्यामुळे वाढीव कचऱ्याचे काय, असा प्रश्ननिर्माण झाला आहे.

त्यामुळे प्रकल्प परिसरात कचऱ्याचे ढीग साचत आहेत यात आता ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गॅस निर्मितीसाठी प्रशासनाने बीपीसीएलशी संवाद साधला आहे. आतापर्यंत दोन वेळा बैठकादेखील झाल्या आहेत बीसीसीएलने कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याच तयारी दर्शविली आहे. दररोज सुमारे २०० टन कचऱ्याव प्रक्रिया करेल. येत्या मंगळवारी अंतिम बैठक होणा असल्याचेही आयुक्त येडगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT