नगरसेवक दामले यांच्याकडून निवडणूक नियमांचे उल्लघंन File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : नगरसेवक दामले यांच्याकडून निवडणूक नियमांचे उल्लघंन

नोटीस बजावण्याचे न्यायालयाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : प्रभाग २२ ब मधून निवडून आलेल्या नगरसेवक अशोक दामले यांनी निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (महानगरपालिका न्यायालय) न्यायालय यांनी नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २२-ब मध्ये भाजप उमेदवार अशोक धोंडीबा दामले हे विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांच्या निवडीला गिरीश लुटे यांनी अॅड. रवींद्र गोरे आणि अॅड. एस.एस. केरे यांच्या मार्फत महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १६ नुसार निवडणूक याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

याचिकेत नमूद करण्यात आले की, अशोक दामले यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावकाची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आढळून आला नाही, त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्याचा निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारा आहे.

या याचिकेत म्हणणे मांडण्यात आले आहे की, विजयी उमेदवार अशोक दामले यांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेले फौजदारी प्रकरणाचा उल्लेख त्यांच्या उमेदवारी अर्जात केलेला नाही, पोस्टल मतदानामध्ये विजयी उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांना दबावाखाली काम करायला लावले. तसेच धार्मिक भावना आधारे हिंदू मतदारांना प्रभावित केले. या मुद्द्यांच्या आधारे नगरसेवक अशोक दामले यांची निवडणूक रद्द करण्याची विनंती गिरीश लुटे यांनी केली आहे. प्रकरणात याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. रवींद्र गोरे आणि अॅड. एस.एस. केरे काम पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT