Chhatrapati Sambhajinagar bike theft arrest Pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar bike theft arrest - मैत्रिणींसोबत मौजमजेसाठी दुचाकी चोरी; तीन चोरट्यांना अटक

छत्रपती संभाजीनगर - एमआयडीसी सिडको पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - मैत्रिणींसोबत पैसे उडवून मौजमजा करण्यासाठी चक्क दुचाकींची चोरी करणाऱ्या तीन तरुण चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई एमआयडीसी सिडको पोलिसांनी केली. या तिघांकडून चोरीच्या तब्बल तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

संजय विनोद जाधवर, सुशांत मंगेश भालेराव आणि युवराज विष्णू चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी विशेष पथकाचे कर्मचारी एका हॉटेलजवळ गस्त घालत होते. त्यावेळी मोपेडवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली.

चौकशीत त्यांनी ही मोपेड क्रांती चौक परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर सखोल चौकशी केली असता टाऊन सेंटर परिसरातून आणखी दोन दुचाकी चोरल्याचे समोर आले.

दुचाकीचे हँडल लॉक तोडण्यासाठी हे चोरटे थेट पायाने हँडलवर जोरदार प्रहार करत असत. लॉक तुटल्यानंतर वायर डायरेक्ट करून दुचाकी घेऊन पसार होत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्हीही आरोपींना अटक करून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT