जेरबंद केलेला बिबट्या. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Leopard Rescue Operation : ८ दिवसांत २ बिबटे जेरबंद

घोडेगाव शिवारात गेल्या १५ दिवसांत बिबट्याने मानवावर दोन वेळा हल्ला केला होता.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाढत्या मानव-बिबट्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरअहिल्यानगर वनविभाग आणि छत्रपती संभाजीनगर येथील 'मॅनविथइंडिज' संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांतून अवघ्या आठ दिवसांत दोन बिबट्यांना यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले.

घोडेगाव शिवारात गेल्या १५ दिवसांत बिबट्याने मानवावर दोन वेळा हल्ला केला होता. शुक्रवारी सकाळी पुन्हा हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तातडीने बचावकार्य हाती घेतले.

उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश टालोरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथील मॅनविथइंडिज संस्थेच्या विशेष रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. वनविभाग व रेस्क्यू टीमने केलेल्या अचूक नियोजनामुळे अवघ्या काही तासांत, त्याच दिवशी संध्याकाळी बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाले.

अहिल्यानगर वनविभागाची तत्परता आणि मॅनविथइंडिज संस्थेच्या टीमचे तांत्रिक कौशल्य यांच्या समन्वयामुळे ही मोहीम वेगाने फत्ते झाली. मानव आणि वन्यजीव या दोघांचीही सुरक्षितता राखत संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग व रेस्क्यू टीम पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT