Chhatrapati Sambhajinagar traffic diversion AI image
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : उद्या अण्णा भाऊ साठे चौक ते उद्धवराव पाटील चौक मार्ग राहणार बंद

शहर वाहतूक शाखेने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.१२) छत्रपती संभाजीनगरमध्ये विशाल जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, दुपारी १२ वाजेपासून ते जाहीर सभा संपेपर्यंत 'अण्णा भाऊ साठे चौक - विभागीय आयुक्त कार्यालय - उद्धवराव पाटील चौक' हा मुख्य मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शहर वाहतूक शाखेने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

जिल्ह्यातील समस्त भीमसैनिक, आंबेडकरी पक्ष-संघटना आणि अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ही शांततापूर्ण जाहीर सभा पार पडणार आहे. आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करण्यासोबतच अन्य अनेक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा महाएल्गार पुकारण्यात आला आहे.

या सभेला होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, रस्त्यांवर नागरिकांची आणि वाहनांची मोठी कोंडी होऊ नये, नागरिकांची गैरसोय टळावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाहतूक मार्गात बदल केल्याचे शहर वाहतूक शाखा -१ च्या पोलिस निरीक्षक रेखा लोंढे यांनी वाहतूक कळविले आहे.

वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग

मार्ग १: चांदणे चौक गणेश कॉलनी एन-१२ श्री गणेश विसर्जन विहीर -सत्य विष्णू हॉस्पिटल - उद्धवराव पाटील चौक, सत्यविष्णू हॉस्पिटल चौक, एन-१२ गणपती विसर्जन विहीर टीव्हीसेंटरमार्गे वाहनांना ये-जा करता येईल. मार्ग २ : उद्धवराव पाटील चौक, हडको कॉर्नर, टीव्हीसेंटर, एन-१२ गणपती विसर्जन विहिरीमार्गेही वाहनांना पुढे जाता-येता येईल.

हा मार्ग राहील पूर्णपणे बंद

दुपारी १२ वाजेपासून ते जाहीर सभा संपेपर्यंत 'अण्णा भाऊ साठे चौक - विभागीय आयुक्त कार्यालय - उद्धवराव पाटील चौक' हा मुख्य मार्ग रहदारीसाठी बंद राहिल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT