Skill Hub : छत्रपती संभाजीनगर बनणार 'स्किल हब', आयटीआयसाठी २३८ कोटीची गुंतवणूक file photo
छत्रपती संभाजीनगर

Skill Hub : छत्रपती संभाजीनगर बनणार 'स्किल हब', आयटीआयसाठी २३८ कोटीची गुंतवणूक

कौशल्य विकासाला नवी दिशा, स्थानिक तरुणांना मिळणार रोजगाराच्या संधी

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar to become 'Skill Hub', 238 crore investment for ITIs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: ऑटोमोबाईल हब असलेल्या छत्रपती संभाजीनगरची आता 'स्किल हब' च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सेतू योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या आयटीआय क्लस्टरसाठी २३८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी बेलराईज इंडस्ट्रीज ही अँकर इंडस्ट्री पार्टनर म्हणून सहभागी होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर मंजूर १४ आयटीआय क्लस्टर्समध्ये संभाजीनगरचा समावेश आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील औद्योगिक गरजांशी सुसंगत कौशल्य प्रशिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.

या योजने अंतर्गत संभाजीनगर क्लस्टरची निवड ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक परिसंस्थेच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमधील प्रशिक्षण, अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना उद्योगाशी जोडणाऱ्या उपक्रमांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

उद्योग क्षेत्राचा सक्रिय सहभाग राहणार असून वाहन उद्योगांमार्फत व्यवस्थापनाची तरतूद करण्यात आली आहे. प्रस्तावित रचनेनुसार स्थानिक उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रम प्रशिक्षण पद्धती, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव याबाबत आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय संचालन समितीने प्रायोगिक टप्प्यातून देशभरातील २०० प्रस्तावित आयटीआय क्लस्टर्समध्ये विस्तारित करण्यास मंजुरी प्रातिनिधीक छायाचित्र दिली आहे. याशिवाय १४ आयटीआय क्लस्टर्सच्या धोरणात्मक गुंतवणूक योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याअंतर्गत ३ हजार ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री सेतूच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या गरजांशी सुसंगत कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रम आणि उद्योग-संस्थांमधील समन्वयाला चालना मिळणार असून, स्थानिक युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानावर ३२ नवीन अभ्यासक्रम

योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षण अधिक आधुनिक आणि रोजगाराभिमुख करण्यासाठी ३२ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, अडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ग्रीन हायड्रोजन, ड्रोन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सौर ऊर्जा, 5G आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांचा समावेश आहे.

६० हजा कोटीचा आर्थिक आराखडा

देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करून युवकांना रोजगार व उद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी प्रधानमंत्री सेतू योजना सुरू करण्यात आली.

यास ४ ऑक्टोंबर २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या योजनेचा एकूण आर्थिक आराखडा ६० हजार कोटी रुपयांचा असून, त्यामध्ये केंद्र शासनाचा ३० हजार कोटी रुपये, राज्यांचा २० हजार कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा १० हजार कोटी रुपयांचा सहभाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT