छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात तब्बल ६ लाख १२ हजार ७०१ मतदार जिल्ह्यात अढळून आले नाहीत. त्यामुळे या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आले आहेत. तर २००२ च्या यादीशी मॅपिंग न झालेल्या सुमारे साडेचार लाख मतदारांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी सोमवारी (दि. १७) दिली. तर येत्या २४ ऑगस्टला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करून दावे, हरकती मागविण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार देशात ३० जूनपासून विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. जिल्ह्यातही या मोहिमेसाठी ३२६४ बीएलओ नियुक्त करून काम सुरू करण्यात आले होते. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणीचे काम हाती घेण्यात आले. मतदारांना गणनापत्राचे (एन्युमरेशन फॉर्म) वाटप करणे व नंतर ते अॅपवर ऑनलाइन सादर करण्याचे काम बीएलओंना करावे लागले.
यात अर्जाचे वाटपाची प्रक्रिया वेगाल झाली. मात्र, डिजिटायझेशनचे प्रमाण धिम्या गतीने सुरू राहिले. त्यामुळे सतत या कामाबाबत ओरड सुरू झाली. यावरून जिल्हा प्रशासनाने सुमारे दीडशे बीएलओंना नोटीस बजावून कामाची गती वाढविण्याचे आदेश दिले होते. तर वारंवार सूचनेनंतरही कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली.
दरम्यान, या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ११ हून अधिक जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यासोबतच काम जलदगतीने पूर्ण करणाऱ्यांचा सत्कार झाला. प्रारंभी ३० जुलैपर्यंत एसआयआरला मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत बहुताशं प्रमाणात डिजिटायज पूर्ण झाले नाही. त्यामुळे या कामाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा या कामाला १७ ऑगस्टची डेडलाइन दिली होती.
ही मुदत संपल्याने सोमवारी सर्व तालुक्यांचा अहवाल मागविण्यात आला. त्यानुसार उपजिल्हाधिकारी चौधर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ३२ लाख १६ हजार १५७ मतदारांना अर्जाचे वाटप १०० टक्के वाटप झाले. मात्र, प्रत्यक्षात २६ लाख ३ हजार ४१ (८०.९४ टक्के) मतदारांच्या अर्जाचेच डिजिटायज पूर्ण झाले. आणखी ७३४ अर्जाचे डिजिटायज होणे शिल्लक होते. तर तीनवेळा गृहभेटी देऊनही बीएलओंना तब्बल ६ लाख १२ हजार ३२२ मतदार अढळले नाही.
न आढळलेल्यांची नावे वगळणार
जिल्ह्यात जे मतदार तीन वेळा गृहभेटीत अढळले नाहीत. त्यात प्रामुख्याने मृत मतदार, स्थलांतर झालेले मतदार अथवा दुबार नावे असलेले मतदार असावेत, असा संशय प्रशासनाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेली अढळून न आलेली ही ६ लाख १२ हजार ७०१ मतदार येत्या २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळली जाणार असल्याचे संकेत उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी दिले. दरम्यान, मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे, हरकतींसाठी १ महिना दिला जाणार आहे. त्यानंतर एक महिना सुनावणी सुरू राहील तर २२ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
मध्य, पूर्ण, पश्चिमचेच ३.४१ लाख
जिल्ह्यात वगळण्यात आलेल्या मतदार सर्वाधिक मध्य मतदार संघातील आहेत. या मतदार संघात ३ लाख ६८ हजार ६३९८ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख १७ हजार ३५८ मतदारांचा बीएलओंना कुठेच ठाव ठिकाणा अढळला नाही. त्याखालोखाल पूर्व मतदार संघ असून या मतदार संघाची एकूण मतदार संख्या ही ३ लाख ५३ हजार ८६९ आहे. त्यापैकी १ लाख १७ हार ७५ मतदार वगळण्यात आले आहेत. तर पश्चिम मतदार संघात एकूण ४ लाख ४ हजार ९०१ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ९ हजार ५३० मतदार कुठेच अढळले नसल्याने त्यांची नावे वगळली जाणार आहे.
८०.९२ टक्के डिजिटाईज
जिल्ह्यात एकूण ३२ लाख १६ हजार १६७ मतदार आहेत. त्यापैकी ८०. ९२ टक्के मतदारांचे डिजिटायजेशनचे काम पूर्ण झाले आहेत. त्यात फुलंब्री ३०९४५६ (८२.२१), औरंगाबाद मध्य २५२१२५ (६८.२१), पैठण २९२७८१ (८८.४४), औरंगाबाद पूर्व २३६७४४ (६६.२०), सिल्लोड ३१७३९९ (८७.०२), गंगापूर ३०८४७४ (८४.३२), औरंगाबाद पश्चिम २९५३७१ (७२.९५), वैजापूर २८६७०५ (९०.८४), कन्नड ३००५३४ (९०.८८)