छत्रपती संभाजीनगर

Verul Housefull: छ. संभाजीनगर : सलगच्या सुट्यांमुळे वेरुळ हाऊसफुल; घृष्णेश्वर मंदिर-लेणी परिसराला यात्रेचे स्वरूप

दर्शनासाठीच्या रांगा मंदिर परिसरापासून दूरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले

पुढारी वृत्तसेवा

वेरुळ: १६ ऑगस्ट सलगच्या सुट्यांचा योग आल्याने सकाळपासूनच जगप्रसिद्ध वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि वेरुळ लेणी परिसरात भाविक-पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, संपूर्ण परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे

स्वातंत्र्यदिनाची सुटी आणि त्यानंतरची रविवारची सुटी यामुळे विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक वेरुळमध्ये दाखल झाले. सकाळपासूनच घृष्णेश्वर मंदिराकडे भाविकांचा ओघ सुरू होता. दर्शनासाठीच्या रांगा मंदिर परिसरापासून दूरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहण्यासाठीही पर्यटकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे मंदिर परिसरासह लेणी परिसर दिवसभर गजबजून गेला. रस्त्यांवर आणि परिसरात वाहनांची वर्दळ वाढल्याने वेरुळमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सलगच्या सुट्यांमुळे रविवारी सकाळपासूनच भाविक-पर्यटकांचा ओघ सुरू राहिल्याने घृष्णेश्वर मंदिर आणि वेरुळ लेणी परिसर गर्दीने फुलून गेला असून, संपूर्ण वेरुळला यात्रेचे स्वरूप आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT