औसा ( छत्रपती संभाजीनगर ) : औसा लामजना मार्गावर दावतपुरपाटी जवळ कार मोटारसायकल अपघातात तीन निलंगा तालुक्यातील तीन युवक ठार झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील सरवडी येथील तीन तरूण आपल्या एका मोटारसायकलने रविवारी (दि. २५) रात्री ११ वाजेच्या सुमारास औसा येथून आपल्या मूळ गावी सरवडी या गावाकडे जात होते. त्यावेळी लामजना लातूर मार्गावरील दावतपूर पाटी जवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मोटारसायकल ला जोराची धडक दिली. यात मोटारसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक किसन मरडे, गणेश यादव, मुरली दन्तराव, राजपाल साळुंके व शिद्रे यानी त्या जखमीना तात्काळ पुढील उपचारासाठी औसा येथे येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मयत घोषित करण्यात आले.
सोमनाथ दयानंद हिप्परगे ( वय २२) अभिजीत शाहूराज इंगळे (वय २३), दिगंबर दत्ता इंगळे (वय २७) राहणार सर्वजण सरवडी ता निलंगा. या अपघातातील मृत्यू झालेल्यापैकी दिगंबर दत्ता इंगळे याच लग्न झाले असून त्यांना एक मुलगा एक मुलगी, आई, वडील पत्नी आहे बाकी दोन जण आविवाहीत आहेत. अदयाप गुन्हा नोंद झाला नसून अधिकचा तपास किल्लारी पोलिस करत आहेत.