Chhatrapati Sambhajinagar flooding Ajintha caves road blocked
गणेश कोलते
पिंपळदरी: सकाळपासूनच (दि.२२ सप्टेंबर) सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे पिंपळदरी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गावात अनेक घरांत पाणी शिरले असून काही भागांत रस्तेही पूर्णतः जलमय झाले आहेत. काही घरांचे सामान पाण्यात भिजले आहे. नागरिकांना बाहेर पडणे अवघड झाले असून, शाळा आणि दुकानांवरही याचा परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य सुरु करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता असल्याचे प्रशासमनाने म्हटले आहे.