छत्रपती संभाजीनगर :महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत अद्याप कोणतीही चर्चा करण्यात आ-लेली नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबाबत शेवटच्या टप्प्यात वाटाघाटी करण्याचे पक्षाच्या नेत्यांनी ठरविले आहे.
महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुतीतील घटक पक्षांच्या जागा वाटपाच्या बैठका होत आहेत, पण दुसरीकडे महाविकास आघाडीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिव-सेना उवाठाच्यावतीने उमेदवारी अर्ज भरून घेण्यात येत आहेत.
बुधवारी ३४५ इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यात आले. किती प्रभागात उमेदवार देता येतील याबाबत पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीशी संपर्क करण्यात आलेला नाही. या दोन्ही पक्षांसोबत शेवटच्या टप्प्यात चर्चा करण्याचे शिवसेना उबाठाने ठरविले आहे.
आम्ही आधी आमच्या पक्षाच्या उमेदवारांची निश्चिती करत आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत तूर्तास तरी चर्चा झालेली नाही. त्यांच्याकडूनही आमच्याशी संपर्क करण्यात आला नाही. आमची तयारी पूर्ण झाल्यावर त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल.चंद्रकांत खैरे, नेते, शिवसेना उबाठा
आमची ८५ ते ९० 66 आवची ध्यो दो तयारी आहे. सध्या उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. मनसे, काँग्रेस व इतर पक्षांबाबत नंतरच्या टप्प्यात निर्णय घेण्यात येईल. अद्याप इतर पक्षांसोबत चर्चा झालेली नाही.अंबादास दानवे, माजी विरोधी पक्षनेता, शिवसेना उबाठा