Municipal contract workers pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Municipal Corporation : २११२ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार

मनपा आयुक्तांचा निर्णय, कामचुकारांना देणार नारळ

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या विविध विभागांत तब्बल २ हजार ११२ हून अधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यातील बहुतांश कंत्राटी कामचुकार असून या सर्वांचा लवकरच मेळावा घेऊन कोणाकडे कोणते का आहे, कोण कामचुकारपणा करतो, या सर्वांचे मूल्यांकन केले जाणार असल्याचे सांगत अनावश्यक कंत्राटींना सेवेतून काढणार असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

महापालिकेत सध्या नव्या चार आणि जुन्या दोन अशा सहा एजन्सीमार्फत २११२ कंत्राटी मनुष्यबळ घेण्यात आला आहे. यात सर्वाधिक कंत्राटी सिंग एजन्सीचे आहेत.सध्या कंत्राटींची संख्या २११२ वर पोचहली आहे. परंतु, असे असतानाही अनेक विभागामार्फत वाढीव कर्मचाऱ्यांची मागणी होत आहे.

यासंदर्भात येडगे यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले, सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांची लवकरच बैठक घेणार आहोत. त्यात कोणत्या विभागात प्रत्यक्षात किती कर्मचारी कार्यरत आहेत? ते विभागात दररोज हजर असतात का, त्या त्या विभागांना नेमक्या किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, अनावश्यक कर्मचारी असतील तर त्यांना आणि कामचुकरांना सेवेतून काढण्यात येईल, असे आयुक्त येडगे यांनी सांगितले. त्यामुळे दोन हजारांपैकी किती जणांवर कपातीची कुऱ्हाड कोसळणार, यावरून कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

कंत्राटींच्या लाचेचे प्रमाण वाढले

महापालिकेच्या अनेक विभागांत सध्या कंत्राटी राज आहे. त्यातील बहुतांश कंत्राटींकडे विभागप्रमुखांनी आर्थिक कामेही दिली आहे. त्यातूनच हे लाचेचे प्रकार समोर येत आहेत. महापालिकेच्याच कर्मचाऱ्याकडे आर्थिक विषयासंदर्भातील जबाबदाऱ्या असल्या पाहिजे, परंतु, कायमस्वरुपींची संख्या कमी आहे. तरीही विभाग प्रमुखांवर जबाबदाऱ्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT