Chhatrapati Sambhajinagar ST bus pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar ST bus | वरिष्ठांचे आदेश धाब्यावर : मुख्य बसस्थानकात मर्जीचा खेळ

कमी वेतनधारक कार्यालयात : इतरांना मात्र प्रवासी सेवेत जुंपले

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एसटी महामंडळाने उत्पन्न वाढ आणि ओव्हर टाईमवर होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी ज्याचे बेसिक कमी आहे त्यांना विविध मार्गांवर तर जास्त बेसिक असणाऱ्या चालक वाहकांना कमी अंतरांच्या किंवा गरज असेल तर कार्यालयीन काम द्यावे, असा नियम असताना मुख्य बसस्थानकांतील अधिकारी या नियमाला धाब्यावर बसवत कमी बेसीकवाले कार्यालयीन कामांसाठी तर जास्त बेसीकचे प्रवासी सेवेत जुंपले आहेत.

एवढेच नाही तर गोंधळ नको म्हणून सोमवारी (दि.६) कमी बेसीकच्या कर्मचाऱ्यांना केवळ एकच दिवस प्रवासी सेवेत जुंपले, मंगळवारी पुन्हा कार्यालयतीन कामांला जुंपले. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जास्त बेसिक असणाऱ्या चालक-वाहकांना लांब पल्ल्याचे कर्तव्य दिले तर त्यांना ओव्हरटाईम जास्त द्यावा लागतो. त्यामुळे कमी बेसिक असणाऱ्यांनाच लांब पल्ल्याचे कर्तव्य द्यावे, असे वरिष्ठांनी आदेश दिले होते. प्रसंगी कार्यालयीन कामांसाठी चालक वाहकांपैकी जास्त बेसिक आणाऱ्यांना द्यावे, अशीही सूचना देण्यात आली होती.

दरम्यान, या सूचनेला हरताळ फासत कमी बेसिक परंतु मर्जीतील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामांसाठी वापरण्यात येत आहे, तर जास्त बेसिक असलेल्या चालक-वाहकांना कर्तव्यावर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी बनवण्यात आलेले नियम पायदळी तुडवण्याचे काम सध्या अनेक ठिकाणी सुरू आहे.

काही कर्मचाऱ्यांबाबतच सकारात्मक

कोणाला कार्यालयीन कामकाज करण्याची इच्छा असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा त्यावर विचार केला जाईल असे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान या नियमाला बगल देत येथील अधिकारी काही मर्जीतील कर्मचाऱ्यांसाठीच सकरात्मक आहे. इच्छेनुसार अर्ज करण्याचीही मुभा येथील अधिकारी देत नाहीत.

वरीष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मर्जीतील कर्मचाऱ्यांबाबतच सकारात्मक निर्णय घेत असल्याने देवाण घेवाण झाली की काय अशी चर्चा जोर धरत आहे. याचबरोबर आपापसांत कर्तव्य बदलावर निर्बंध असतानाही येथे मात्र अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने सर्व काही बिनबोभट सुरू आहे. याचा त्रास मात्र नियमित काम करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT