Child Marriage Chhatrapati Sambhajinagar file photo
छत्रपती संभाजीनगर

Child Marriage: बाप की वैरी? १३ वर्षांच्या लेकीचं ३० वर्षांच्या नवरदेवाशी लावलं लग्न; चिमुकलीने सांगितली आपबिती

Chhatrapati Sambhajinagar News: माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम पित्याने स्वतःच्या १३ वर्षीय अल्पवयीन लेकीचा विवाह ३० वर्षांच्या मुलाशी लावून दिला.

पुढारी वृत्तसेवा

Child Marriage Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर: एकीकडे मुलींच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, शहरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यसनाधीन नराधम पित्याने स्वतःच्या १३ वर्षीय अल्पवयीन लेकीचा विवाह ३० वर्षांच्या मुलाशी लावून दिला. मात्र, शहर पोलीस दलाच्या दामिनी पथकाने वेळीच धाडसी कारवाई करत या चिमुकलीची सासरच्या तावडीतून सुटका केली आहे.

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचा वडील हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्याने आपल्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचा विवाह वयाने दुपटीहून अधिक मोठ्या असलेल्या (३० वर्षे) व्यक्तीशी लावून दिला. बालविवाहासारखा गंभीर गुन्हा करून या चिमुकलीचे आयुष्य अंधारात ढकलण्याचा प्रयत्न नातेवाईकांकडून झाला.

दामिनी पथकामुळे चिमुकलीचे आयुष्य वाचले

या बालविवाहाची माहिती मिळताच शहर पोलीस दलाच्या दामिनी पथकाने तातडीने हालचाली केल्या. मुलीच्या सासरी जात पथकाने अत्यंत धाडसीपणे तिची सुटका केली. दामिनी पथकाच्या या तत्परतेमुळे एका चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे.

दोषींवर कठोर कारवाई होणार!

बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार, पीडित मुलीची रवानगी सध्या 'भगवान बाबा बालिकाश्रम' येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या वडिलांसह, या विवाहात सहभागी असलेल्या सर्व नातेवाईकांवर कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT