बिबट्या  file photo
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : हायकोर्ट परिसरात बिबट्याच्या ठशांचीच चर्चा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वास्तव्याच्या चर्चाना उधाण आले आहे. यावेळी बिबट्या हायकोर्ट परिसरसातील न्यायमूर्तींच्या निवासस्थानाच्या आवारात आढळल्याची चर्चा सुरु होती. मात्र वन विभागाने केलेल्या पाहणीत त्या परिसरात कुठेही बिबटयाचे पगमार्क किंवा कुठलेही निशाण दिसून आले नाही. ज्यामुळे बिबट्या दिसला, अशा चर्चा सुरु झाल्या, ते ठसे कुत्र्याचे असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी (दि.२७) रात्री वन विभागाच्या पथकाने हायकोर्टच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली.

दरम्यान, १५ जुलै रोजी शहरात बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर जवळपास १५ दिवस संपूर्ण शहरात बिबट्यांचीच चर्चा होती. त्यानंतर वन विभागाने बिबट्या या भागात गेल्याचे स्पष्ट केले, तरीही काही दिवस नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता कुठे परिस्थिती निवळत असताना पुन्हा एकदा बिबट्याच्या वावड्यासमोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत असल्याचे दिसून येत आहे. मात्र बिबट्या हा शहराबाहेरच आहे.

हायकोर्ट आवारात काही गैरसमजातून बिबट्या असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. संपूर्ण परिसराची कसून चौकशी करण्यात आलेली आहे. त्यातही बिबट्याचे एकही निशाण आढळून आलेले नाही. त्यामुळे बिबटया या भागात असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

सदर परिसराची कसून पाहणी करण्यात आली आहे. कुठेही बिबटया असल्याचे पुरावे दिसून आलेले नाही. त्यामुळे नागरिकनांनी घाबरून जाऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. वन विभाग पूर्णपणे सतर्क आहे.
आप्पासाहेब तागड, वन अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT