सिंधुदुर्ग : केर येथे बिबट्या थेट पोहोचला घरापर्यंत!

घरातील मंडळींची भीतीने गाळण उडाली
Sindhudurg leopard News
बिबट्या pudhari
Published on
Updated on

दोडामार्ग : केर-अवाटवाडी येथे भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या थेट घरापर्यंत पोहोचल्याची घटना शनिवारी रात्री घडली. खिडकीवर बिबट्याच्या पंजाच्या खुणा असून, घरातील मंडळींची भीतीने गाळण उडाली. काही दिवसांपूर्वीच केर, मोर्ले रस्त्यावर बिबट दिसला होता; मात्र आता तो भर लोकवस्तीत येऊ लागल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याला वन विभागाने सापळा रचून पकडण्याची मागणी उपसरपंच तेजस देसाई यांनी केली आहे.

केर येथील ग्रामस्थ सगुण नाईक आणि ग्रामस्थांना मोर्ले ते केर रस्त्यावर बिबट सातत्याने दिसायचा. या बिबट्याने शिकार केली असावी आणि त्या परिसरात फिरत असावा, असा ग्रामस्थांचा अंदाज असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. शनिवारी रात्री 10.30 वा.च्या सुमारास बिबट्याने केर-अवाटवाडी येथील काशीराम धुरी या ग्रामस्थाच्या खिडकीवर झडप मारली. यावेळी मोठा आवाज झाल्याने घरातील मंडळी पहायला आल्यावर त्यांना एका प्राण्याच्या नखाच्या खुणा खिडकीवर दिसल्या. या खुणा पाहून घरातील मंडळींची पाचावर धारण बसली. मांजराची शिकार करताना बिबट्या आला असावा असा अंदाज बांधला. सकाळी पाहिले असता घरातील एक मांजर गायब झाल्याचे समजले. याबाबत उपसरपंच तेजस देसाई यांना कल्पना देताच त्यांनी वनविभाग अधिकार्‍यांना कळविले. त्यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून तो आता थेट लोकवस्तीत आला आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी वनविभागाने मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचे उपसरपंच देसाई व ग्रामस्थांनी सांगितले.

Sindhudurg leopard News
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवानिमित्त गावी येत असलेल्या तरूणाचा रेल्वेतून पडून मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news