Hailstorm Impact on Farmers Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Unseasonal Rain | खुलताबाद तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Khultabad Hailstorm News | खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूरसह भांडेगाव, खांडी पिंपळगाव, माटरगाव, कानडगाव, देवळाना आणि वडोद परिसरात अवकाळीचा तडाखा

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar Rain

सुलतानपूर : खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूरसह भांडेगाव, खांडी पिंपळगाव, माटरगाव, कानडगाव, देवळाना आणि वडोद परिसरात मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजता अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली. या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामातील पिके बाधित झाली आहेत. विशेषतः गव्हाचे पीक पूर्णपणे आडवे पडून भुईसपाट झाले आहे.

गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती या नुकसानीमुळे आणखी गंभीर बनली आहे.

दरम्यान, बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत पाहणी करून नुकसानीचा अचूक आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT